सातारा : वाघाची नळी येथील शनिवार पेठ गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या ‘गुरुपौर्णिमा कला-क्रीडा महोत्सव २०१५’ अंतर्गत झालेल्या १४ वर्षाखालील बास्केलबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात सातारा इंग्लिश मीडियम स्कूलने तर मुलींच्या गटात डोंबिवलीच्या विद्यानिकेतन स्कूलने विजेतेपद मिळविले.ही स्पर्धा नुकतीच छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पार पडली. स्पर्धेत डोंबिवलीसह सातारा जिल्ह्यातील एकूण १७ संघांनी सहभाग नोंदविला होता. सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विवेक बडेकर याच्या पासिंग कौशल्याच्या जोरावर तेजराज मांढरेने सर्वाधिक १६ गुण नोंदवत स्पर्धेतील अंतिम सामन्यात के.एस. डी. शानभाग विद्यालयाचा ३४-१६ असा पराभव केला. तेजराजला दीप अविरकरने ८ गुण नोंदवत साथ दिली. शानभाग विद्यालयाकडून श्रेयस कथाडेने ९ तर आदित्य नेवासेने ५ गुण नोंदवले. मुलींच्या गटात डोंबिवलीच्या विद्यानिकेतन स्कूलने ३१-१० असा पराभव केला. विद्यानिकेतनच्या वैष्णवी चाळकेने ९, आर्या नायरने ८, ऋचा गाडगीळने ६ गुण नोंदवले. अर्जुन जाधव, अनिकेत काळे, रोहन भोसले, योगेश जगताप, सुधीर इंदलकर, भूषण चव्हाण, अजित घोरपडे, गौरव माने, ऋषभ गडचे यांनी पंच म्हणून काम पाहिले.स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक तुषार पाटील यांच्या हस्ते झाले. यशस्वी संघांना लायन्स क्लब आॅफ एमआयडीसीचे अध्यक्ष डी. वाय. पाटील, जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव ललित सातघरे यांच्या हस्ते रोख रक्कम, कै. रणजित गुजर स्मृतिचिन्ह देण्यात आले. तेजराज मांढरे, वैष्णवी चाळके यांना उत्कृष्ट खेळाडू तर विवेक बडेकर, त्रिवेणी बने यांना उदयोन्मुख खेळाडूचे सन्मानचिन्ह देण्यात आले. संयोजन समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ लाटकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष काठाळे, श्याम इंगवले, योगेश कुलकर्णी, विशाल साळुंखे, सूर्या स्वामी, शकील शेख, विनोद घोरपडे, नदीम मुजावर, अजय आमंदे, गणेश साबळे, संकेत बेलकर, आदित्य काठाळे, चिन्मय काठाळे, नितीन साळवी, विशाल चव्हाण, हर्षल लाटकर यांनी संयोजन केले. या स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील क्रिडा प्रेमी आणि खेळाडूंनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
कला-क्रीडा महोत्सवात ‘एसइएमएस’चा दबदबा
By admin | Updated: August 6, 2015 20:42 IST