शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान दिन उत्साहात; अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेने अनुभवला शिवकाल!

By सचिन काकडे | Updated: January 12, 2024 19:26 IST

स्वाभिमान दिन उत्साहात साजरा : छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

सातारा : जय भवानी.. जय शिवाजी असा जयघोष, हलगीचा कडकडाट अन् तुतारीच्या निनादात किल्ले अजिंक्यताऱ्यावर शुक्रवारी छत्रपती शाहू महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन तथा सातारा स्वाभिमान दिन मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो शिवभक्तांनी या सोहळ्याला हजेरी लावल्याने अजिंक्यताऱ्यावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली.

छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची ज्वलंत राजधानी म्हणून साताऱ्याची देशभर ओळख आहे. युगनिर्मात्या शिवरायांचे नातू व धर्मवीर संभाजीराजेंचे पूत्र छत्रपती शाहू महाराज यांचा १२ जानेवारी १७०८ रोजी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर राज्यभिषेक झाला होता. या विलक्षण घटनेला यंदा ३१६ वर्षे पूर्ण होत असून, सातारा शहराच्या संस्थापकांचा स्मरणदिन व सातारा स्वाभिमान दिन किल्ले अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर मोठ्या दिमाखात पार पडला.

स्वाभिमान दिनानिमित्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेची शुक्रवारी सकाळी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंगळाई देवीपर्यंत पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवतांचे दर्शन घेऊन पालखी सोहळा राजसदरेवर विसावला. यावेळी शिवभक्तांनी दिलेल्या गगणभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. भगवे फेटे अन् भगव्या पोशाखातील मावळ्यांमुळे किल्ल्यावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली. राजमाता जिजाऊ यांचीदेखील जयंती असल्याने उपस्थित महिला भगिनींनी छत्रपती शाहू महाराजांच्या पालखीला खांदा दिला. पालखीचा मान मुस्लिम बांधवांनादेखील देण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, प्रशांत आहेरराव, कन्हैय्यालाल राजपुरोहित,  दत्ताजी भोसले, अमर जाधव, डॉ. संदीप मंहिद, अजय जाधवराव, रेणू येळगावकर, शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगड