शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड येथे घातक शस्त्रे जप्त

By admin | Updated: September 7, 2015 22:37 IST

धोत्रेसह पाच अटकेत : सल्या चेप्यावरील खुनी हल्ल्यातील टोळी

कऱ्हाड : कुख्यात गुंड सल्या चेप्यावरील खुनी हल्ल्यात मुख्य आरोपी असणाऱ्या गुंड भानुदास धोत्रे टोळीकडून पोलिसांनी घातक शस्त्रे जप्त केली. शहरातील दत्त चौकात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या टोळीकडून पोलिसांनी सहा लोखंडी कोयते, सुरा व गुप्तीसह एक जीप हस्तगत केली आहे. भानुदास लक्ष्मण धोत्रे (वय ४०), दशरथ हणमंत धोत्रे (३२), सागर रमेश जाधव (२०, तिघेही रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड), अनिल चंद्रकांत पाटणकर (२०, रा. रुक्मिणीनगर, कऱ्हाड), प्रवीण लिंगाप्पा धोत्रे (२२, रा. बुरुडगल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडात काहीजण जीपमध्ये शस्त्रे घेऊन वावरत असल्याची माहिती सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना रविवारी रात्री खबऱ्यामार्फत मिळाली. याबाबत त्यांनी कऱ्हाडात गस्त घालणारे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रमेश गर्जे यांना माहिती दिली. तसेच संबंधितांना तातडीने ताब्यात घेण्याची सूचना केली. त्यानुसार उपनिरीक्षक गर्जे यांच्यासह पोलीस पथक तातडीने संशयितांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. हे पथक शहरातील कृष्णा नाक्याकडून उपजिल्हा रुग्णालय, विजय दिवस चौक, बसस्थानक मार्गे दत्त चौकात आले. मात्र, त्यांना संशयित जीप आढळून आली नाही. त्यानंतर पथक दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वळसा घालून मुख्य बाजारपेठेतून आझाद चौकाकडे निघाले. त्यावेळी मुख्य बाजारपेठेतून एक जीप (एमएच १२ पीए १६१४) दत्त चौकाकडे येत असल्याचे दिसले. पोलिसांनी जीप अडवली व सर्वांना खाली उतरण्यास सांगून चौकशी सुरू केली. जीपची झडती घेतली असता, सीटखाली लपवून ठेवलेले कोयते, सुरा व गुप्ती आढळून आली. या शस्त्रांबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पोलीस पथकाने जीपसह सर्व शस्त्रे ताब्यात घेऊन संशयितांना शहर पोलीस ठाण्यात आणले. शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. कऱ्हाड शहर पोलिसांत नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)कसून तपासभानुदास धोत्रे याच्यासह अटक करण्यात आलेल्या इतर चौघांकडे पोलीस कसून तपास करीत आहेत. कोयते, सुरा व गुप्ती ही घातक शस्त्रे घेऊन हे सर्वजण कोठे निघाले होते? त्यांचा काही कट होता का, या दृष्टीने सध्या पोलीस तपास सुरू आहे.