शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

दिवसभर घामाच्या धारा... रात्री पावसाच्या गारा

By admin | Updated: March 31, 2017 22:57 IST

खटाव, कोरेगावात पाऊस; साताऱ्यातही मुसळधार

सातारा : साताऱ्याचे तापमान शुक्रवारी दिवसभर ३८ अंश सेल्सिअस होते. दुपारी तीननंतर काळे ढग जमा झाले अन् रात्री सातच्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्यानंतर तापमान ३५ अंशांवर आले. रात्री गारांबरोबरच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर पारा आणखी खाली घसरून २२ अंशावर स्थिरावला. खटाव, कोरेगाव तालुक्यांतही दमदार पाऊस झाला.साताऱ्यासह जिल्हा कडक उन्हामुळे तापलेला असल्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागलेल्या असतानाच शुक्रवारी सायंकाळी खटाव, कोरेगाव तालुक्यात, तर रात्री सातनंतर साताऱ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. खटाव : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या खटाव ग्रामस्थांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसानेदिलासा मिळाला. दुपारी तीनपासूनच काळ्या ढगांनी आभाळ भरून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवेत अधिकच उष्मा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साठले होते. तालुक्यातील चौकीचा आंबा परिसरातील अंबेरी येथे सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतात पाणी साठले होते, तर ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची पळापळ झाली. उन्हाळ्यात पडलेला पहिलाच पाऊस असल्याने लहान मुले व तरुणांनी पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. सातारा तासभर अंधारातसाताऱ्यात दुपारी तीनपासून काळे ढग जमा झाले होते. रात्री सातच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. सुमारे तासभर संपूर्ण शहर अंधारात होते. रात्री आठला विद्युत पुरवठा सुरळीत झाला. कांदा झाकण्यासाठी गडबडखटाव परिसरात दुपारी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काहीकाळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता, तर शेतात काम करणाऱ्या मजुरांची एकच तारांबळ उडाली होती. कांदा काढणीची लगबग सुरू असल्याने कांदा सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची गडबड झाली.फोटो ३१ सातारा ०१खटाव येथे शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने भिजवले. कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लहान मुलांनी पावसात खेळण्याचा आनंद घेतला.