शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरातील दुसऱ्यांदा नियम मोडलेली दोन दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:14 IST

CoronaVirus Satara : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानांसह इतर ठिकाणांच्या दहा दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामधील दोन दुकानदारांनी दुसऱ्यांदा नियम मोडल्याने त्यांची दुकाने सील केली आहेत. संबंधित दुकानदारांकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

ठळक मुद्देमलकापुरातील दुसऱ्यांदा नियम मोडलेली दोन दुकाने सील दहा दुकानांवर दंडात्मक कारवाई; १० हजार दंड वसूल

मलकापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानांसह इतर ठिकाणांच्या दहा दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामधील दोन दुकानदारांनी दुसऱ्यांदा नियम मोडल्याने त्यांची दुकाने सील केली आहेत. संबंधित दुकानदारांकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी दुपारी शहरात गर्दीची चाहूल लागताच फिरून कारवाईची धडक मोहीम राबवली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंशिवाय इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही शहरातील अनेक दुकानांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याची बाब निदर्शनास आल्याने संयुक्त पथकाने कारवाईची धडक मोहीम राबवली.जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर ६ व दिलेल्या वेळेपेक्षा जादा वेळ दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी ४ अशा १० दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १० हजार रुपये दंडही वसूल केला. त्यापैकी दोन दुकानदारांनी दुसऱ्यांदा नियम मोडल्यामुळे त्यांची दुकाने सील केली. या कारवाईत दिवसभरात मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश काळे, सागर निकम, तेजस शिंदे, सुभाष बागल, वैभव आरने यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर