शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

घरावर दरड अन् मनात धडकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:23 IST

सातारा : केसरकर पेठेतील हरिजन-गिरीजन सोसायटीत एका घरावर शनिवारी रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ...

सातारा : केसरकर पेठेतील हरिजन-गिरीजन सोसायटीत एका घरावर शनिवारी रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी सकाळी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून ही दरड हटविण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, केसरकर पेठेत अय्याज इनामदार हे पत्नी व दोन मुलांसमवेत राहतात. हरिजन-गिरीजन सोसायटीनजीक डोंगरउतारवर त्यांचे घर आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इनामदार कुटुंबीय जेवण केल्यानंतर झोपी गेले. यावेळी अचानक त्यांच्या घरावर मोठी दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर झालेल्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी धावधाव सुरू केली. दरड पडल्याची घटना निदर्शनास येताच नागरिकांनी अय्याज इनामदार यांना आवाज देऊन झोपेतून जागे केले.घराच्या दरवाजासमोरच दरड कोसळल्याने बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे मागील दरवाजा तोडून इनामदार कुटुंबीयांना घरातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, रविवारी सकाळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यांनतर पालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने घरावरील दरड हटविली.नागरिकांमध्येभीतीचे वातावरणअजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक वसाहती आहेत. पावसाळा सुरू झाला की किल्ल्यावरून दगडी व दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. सातारा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळेच हरिजन-गिरीजन सोसायटीनजीक घरावर दरड कोसळली. या घटनेमुुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.