शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

शालेय पोषण आहारचे कर्मचारी मुंबईत उभारणार लढा..

By नितीन काळेल | Updated: June 13, 2024 21:12 IST

विविध मागण्या प्रलंबित : दीड हजार मानधनवाढीचे आश्वासनही पूर्ण नाही

सातारा : महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून दीड हजार रुपये मानधनवाढीचेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीने २८ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाचा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २४ हजार रुपये मानधन देण्याचीही मागणी आहे.

याबाबत शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्यावतीने (आयटक) जिल्हाधिकारी तसेच प्राथिमक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन गांभिर्याने पाहत नाही. फक्त तोंडी आश्वासने देण्यात येतात. डिसेंबर २०२३ मध्ये नागपूर येथे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलेले. त्यावेळी शालेय शिक्षणमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दीड हजार रुपये वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या अनुषंगाने काहीही कार्यवाही झालेली नाही. तसेच इतर मागण्यांसाठीही आता २८ जूनपासून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील हे आंदोलन शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहे.

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना २४ हजार रुपये मानधनवाढ देण्यात यावी, त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. थकित मानधन तत्काळ द्यावे, शासकीय सेवेचा लाव द्यावा. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १२ महिन्यांत वेतन देण्यात यावे, योजनेचे खासगीकरण करण्याचा डाव रद्द करावा, शाळेत पटसंख्या कमी झाल्यास शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात कपात करु नये आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे.हे निवेदन देताना संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅड. नदीम पठाण, आयटक काैन्सिल सदस्या कविता उमाप, सचिव विठ्ठल सुळे, संघटक संदीप माने, संजय पाटील, काॅ. शिवाजीराव पवार, खंडाळा तालुकाध्यक्षा शैला जाधव तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :satara-pcसातारा