म्हसवड : माण तालुक्यातील फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यातील अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक कोटी २८ लाख ७८ हजार ९५० रुपये अनुदान वितरीत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुरेखा माने यांनी दिली. माण तालुक्यात अवकाळी व गारपिटीमुळे फळबागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी केले होते. (प्रतिनिधी)
माण तालुक्यातील शेतकऱ्यांना सव्वाकोटीची भरपाई
By admin | Updated: October 11, 2015 00:06 IST