सातारा : नव्याने सत्तेवर आलेले युती सरकार महाराष्ट्रातील चाळीस टोलनाके बंद करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चारचाकी वाहनांना टोलमधून सरसकट वगळ्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. असे झाले तर त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक चारचाकी धारकांना होणार आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील आनेवाडी, तासवडे तसेच सातारा जिल्ह्याशी संबंधित असलेला पुणे-बंगळूर महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका बंद होणार की नाही, याकडेच आता संपूर्ण सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत.आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. येथील संकलनही लाखोंच्या घरात आहे. एकट्या आनेवाडी टोलनाक्यावर रोज होणारी रक्कम जवळपास दहा ते अकरा लाखांच्या आसपास आहे. जिल्ह्यातील पंचवीस ते तीस हजार चारचाकी वाहने पुण-बंगळूर महामार्गावरुन या ना त्या कारणाने ये-जा करत असतात. त्यामुळे त्यातून टोलनाका व्यवस्थापनाकडे जमा होणारी रक्कम दीड ते दोन लाखांच्या आसपास आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी अनेकदा टोलनाक्यावरील दादागिरी आणि येथील वसुलीच्या विरोधात आंदोलने पुकारली मात्र, टोल व्यवस्थापनाने त्याकडे पुर्णत: दुर्लक्ष केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप तसेच शिवसेनेने त्यांच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे ‘टोलमुक्त महाराष्ट्र’ची घोषणा केली होती. (प्रतिनिधी)खेड-शिवापूर टोलनाकावाहन प्रकारदर (एकेरी/दुहेरीे)कार, जीप, व्हॅनएकेरी ८0 रु., दुहेरी १२0 रुहलके व्यवसायिक, मालवाहक, मिनीबसएकेरी १३0 रु., दुहेरी १९0 रुबस अथवा ट्रकएकेरी २६५ रु., दुहेरी ४00 रुमल्टी अॅक्सल, तीन ते सहा अॅक्सल वाहनएकेरी ४२0 रु., दुहेरी ६३0 रुमोठ्या आकाराचे वाहन (सात अॅक्सल)एकेरी ५१0 रु., दुहेरी ७६५ रुआनेवाडी टोलनाकावाहन प्रकारदर (एकेरी/दुहेरीे)कार, जीप, व्हॅनएकेरी ५५ रु., दुहेरी ८0 रुहलके व्यवसायिक, मालवाहक, मिनीबसएकेरी ९0 रु., दुहेरी १३५ रुबस अथवा ट्रकएकेरी १८५ रु., दुहेरी २८५ रुमल्टी अॅक्सल, तीन ते सहा अॅक्सल वाहनएकेरी २९0 रु., दुहेरी ४३५ रुमोठ्या आकाराचे वाहन (सात अॅक्सल)एकेरी ३५५ रु., दुहेरी ५३0 रु
सातारकर ‘टोलमुक्त’ होणार?
By admin | Updated: December 9, 2014 00:27 IST