शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

रेवंडे खुनात ‘लोकमत’ वृत्त ठरले ‘सुमोटो’ सातारा पोलिसांकडून गुन्हा दाखल : एकाला अटक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:06 IST

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या लक्ष्मण बाबूराव माने (वय ४९, रा. रेवंडे, ता. सातारा) यांचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

ठळक मुद्देपरस्पर न्यायनिवाडा करणाऱ्या पंचांचा पर्दाफाश

दत्ता यादव ।सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या लक्ष्मण बाबूराव माने (वय ४९, रा. रेवंडे, ता. सातारा) यांचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

‘लोकमत’च्या या वृत्ताची दखल घेऊन ‘सुमोटो’द्वारे पोलिसांनी गुरुवारी पहाटे पावणेदोन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला अटकही केली.जितेंद्र हणमंत भोसले (वय ३३, रा. रेवंडे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ‘खूनप्रकरणी गावात समांतर न्यायालय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या अजब घटनेने समाजमन ढवळून निघाले. अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे ‘लोकमत’ने पंच कमिटीच्या निर्णयाची प्रत सादर केली. त्यावेळी तेही हा अजब न्यायनिवाडा पाहून चकीत झाले.

तक्रारदार नसेल तरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ‘सुमोटो’ने तक्रार देणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करतच त्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. अधीक्षकांनी अधिकाºयांना सुनावल्यानंतर रेवंडे येथे टीम दाखल झाली. त्यानंतर पुढील सुत्रे हालली. त्यानंतर पंच कमिटीचा पर्दाफाश पोलिसांनी केला.

या प्रकरणामध्ये पोलीस हेड कान्स्टेबल हणमंत सावंत यांनी स्वत: तक्रार दिली असून, तक्रारीत म्हटले आहे की, पीडित मुलीचा विनयभंग केल्याच्या कारणावरून लक्ष्मण बाबूराव माने हे दारूच्या नशेत जितेंद्र भोसले याला गावात रस्त्याने येता जाता शिवीगाळ करीत होते. या कारणावरून २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रेवंडे गावातील मुख्य रस्त्यावर जितेंद्र भोसले याने लक्ष्मण माने यांच्या डोक्यात कशाने तरी जखम करून त्यांना ठार मारले.पंच कमिटीने न्यायनिवाड्याची प्रत केली सादरखुनासारख्या गंभीर घटनेचा न्यायनिवाडा चक्क गावात होतो, हे कायद्याला आव्हान देण्यासारखे होते. गुन्हा कबूल करून पंच कमिटी जो निर्णय देईल, तो संशयितांनी मान्य केला होता. या अजब न्यायनिवाड्याची प्रत सुरुवातीलाच ‘लोकमत’ने पोलीस अधीक्षकांकडे सादर केली होतीच; परंतु खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वत: पंच कमिटीच्या सदस्याने मूळ प्रत तपासी अधिकारी प्रदीपकुमार जाधव यांच्याकडे सादर केली. त्यामुळे आता तपासाला गती मिळणार आहे.तिघांचे जबाब पूर्णखून झाल्यानंतर लक्ष्मण माने यांच्यावर तातडीने अत्यंसंस्कार करण्यात आले असून, पुरावा शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांनी सध्या बाबूराव माने, रुक्मिणी माने, विनोद भोसले यांचे जबाब घेतले आहेत. पंच कमिटीतील तेरा जणांचे अद्यापही जबाब घेणे बाकी आहे. हे जबाब पूर्ण झाल्यानंतर या खून प्रकरणातील नेमकी माहिती समोर येणार आहे.काय आहे रेवंडी प्रकरण...महाविद्यालयात जाताना एका अल्पवयीन मुलीची तरुणाने छेड काढली होती. त्यानंतर हा प्रकार तिने आपल्या चुलत्याला सांगितला. संबंधित चुलत्याने मुलाला याचा जाब विचारून गावच्या पाराजवळ येऊन शिवीगाळ केली. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी पीडित मुलीचा चुलता रात्री साडेनऊच्या सुमारास ‘दरडी’ नामक भागात मृतावस्थेत आढळून आला होता.या प्रकारानंतर गावकºयांमध्ये खळबळ उडाली. एवढेच नव्हे तर घाईघाईत अत्यंविधीही उरकला गेला. या प्रकाराची माहिती बाहेर पडू नये म्हणून प्रचंड खबरदारी घेऊन तातडीची बैठकही बोलविली गेली. या बैठकीमध्ये दोन्ही कुटुंबांसह काही गावकरी होते. ‘माझ्या मुलीची छेड काढली म्हणून जाब विचारायला गेल्यामुळेच संबंधितांनी माझ्या भावाला मारहाण केली. हेच लोक त्याला जबाबदार आहेत,’ असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी या बैठकीत संबंधितांवर केला होता.या बैठकीमध्ये पंच कमिटी तयार करण्यात आली. या कमिटीने कागदावर अकरा जणांच्या सह्या घेतल्या. त्यामध्ये ‘आमच्यावर केलेला आरोप कबूल असून, या गोष्टीबद्दल ग्रामस्थ जो निर्णय ठरवतील, तो आम्हाला मान्य आहे,’ असे संबंधित संशयितांनी लिहून दिले. खुनासारखा गुन्हा होऊनही पंच कमिटी परस्पर शिक्षा देणारी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता.