शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

साताऱ्याचा आदर्श जगाने घ्यावा! : योगगुरू रविशंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:14 IST

सातारा : ‘देशाचे आरोग्य जपायचे असेल तर गावा-गावांत सेंद्रिय शेतीची लागवड झाली पाहिजे. यासाठी साताºयाने पुढाकार घ्यावा अन् त्याचा आदर्श जगासमोर ठेवावा,

ठळक मुद्दे युवाचार्य संमेलनाला राज्यातील साधकांची उपस्थिती

सातारा : ‘देशाचे आरोग्य जपायचे असेल तर गावा-गावांत सेंद्रिय शेतीची लागवड झाली पाहिजे. यासाठी साताºयाने पुढाकार घ्यावा अन् त्याचा आदर्श जगासमोर ठेवावा, कारण येथे खूप तारे आहेत म्हणून या शहराचे नाव सातारा आहे,’ अशी भावनिक साद आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू रविशंकर यांनी दिली.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावरील संमेलनात बुधवारी सायंकाळी योग व उद्योग तसेच कौशल्य विकासातून राष्ट्राच्या निर्मितीबाबत युवा साधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी सुरुवातीला सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार मोहिमेचे मनापासून कौतुक केले. अनेक सामाजिक उपक्रमांत साताºयाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय शेतीतही या जिल्ह्याने आपली खासियत दाखवावी, असेही आवाहन यावेळी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही, अशी शपथ प्रत्येक युवक आणि युवतींनी घेतली पाहिजे. देशाच्या विकासासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती गरजेची आहे. राजकारण आणि जातीच्या नावाखाली गावागावांत संग्राम सुरू आहे. गाव पातळीवर निवडणुका झाल्या की राजकारणही संपले पाहिजे. सातारा शूरांचा जिल्हा आहे. इथल्या मातीत यश आहे. जलयुक्त शिवारात साताºयाने केलेले काम अवघ्या राज्यासाठी दिशादर्शक आहे. सेंद्रिय शेती आणि विषमुक्त अन्न या दोन बाबींसाठीही साताºयाने प्रयत्नशील राहावे.’

युवा योग अन् उद्योग याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘तरुणांनी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने देशाची उन्नती करावी. योग आयुष्य कुशलतेने जगण्याचं तंत्र सांगतं तर उद्योग जीवन सुखकर करतं. उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने देशाची उन्नती करण्याची संधी तरुणाईने घ्यावी. हिंसारहित समाज निर्माण करण्यासाठी या दोन्ही बाबी आवश्यक आहेत.’या कार्यक्रमात काहीजणांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांना गुरुजींनी यथोचित उत्तरे दिली. दरम्यान, रविशंकर यांना त्यांच्या अनुयायांनी माणदेशी घोंगडे, शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.अनुयायांच्या अश्रूंना वाट मोकळी...तांत्रिक अडचणींमुळे रविशंकर यांचे सकाळच्या सत्रातील काही कार्यक्रम रद्द करावे लागले. दुपारी चार वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर सभामंडपात एकच उत्साह संचारला. ‘जय जय शिव शंभो’च्या जयघोषात त्यांचे मंचावर स्वागत करण्यात आले. साक्षात गुरुदेव यांना पाहण्याचा आनंद अनेकांनी अश्रूंकरवी व्यक्त केला. युवाचार्य संमेलन झाल्यानंतरही परस्परांना अलिंगन देऊन अनुयायांनी आनांदाश्रूंना वाट करून दिली. कार्यक्रमासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून साधक आले होते.