शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा कंदी पेढा आता ‘शुगर फ्री’! देशभरातून, तसेच आखाती देशांतूनही मोठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:57 IST

सचिन काकडे। सातारा : आगºयाचा पेठा, नाशिकची द्राक्षे अन् नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत, तसाच साताºयाचा ‘कंदी पेढा’ही जगप्रसिद्ध ...

ठळक मुद्दे व्यावसायिकांचा नवा प्रयोगया पेढ्यांना भारतासह आखाती देशातून मागणी महाराष्ट्रासह कोलकाता, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, भोपाळ, दुबई ला मागणी

सचिन काकडे।सातारा : आगºयाचा पेठा, नाशिकची द्राक्षे अन् नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध आहेत, तसाच साताºयाचा ‘कंदी पेढा’ही जगप्रसिद्ध आहे. हा पेढा सातारा जिल्ह्याची ओळख असून, याचे नाव जरी काढले तरी जिभेवर गोडवा रेंगाळतो. येथील व्यावसायिकही आता पेढ्यांमध्ये नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. यावेळी खास मधुमेही रुग्णांसाठी ‘शुगर फ्री’ कंदी पेढे बाजारात आले आहेत. या पेढ्यांना भारतासह आखाती देशातून मागणी होऊ लागली आहे.

मधुमेह रूग्णांची संख्या जगभरात झपाट्याने वाढत आहेत. त्यांना गोड पदार्थ वर्ज असले तरी मनापासून खावेसे वाटतात. ही गोष्ट लक्षात घेऊन ‘शुगर फ्री’ कंदी पेढे बाजारात आले आहेत. पेढा हा प्रामुुख्याने खवा आणि साखरेपासून बनविला जातो. हे दोन पदार्थ पेढ्यातील महत्त्वाचे घटक. मात्र, ‘शुगर फ्री’ कंदी पेढ्यात या दोन्हींचाही वापर केला जात नाही. केवळ दुधाचा वापर करून हा पेढा तयार केला जातो. त्यामध्ये जो गोडवा निर्माण होतो, तो दुधापासून येतो. सजावटीसाठी यामध्ये केसरचा उपयोग केला जातो, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.

कंदी पेढ्याच्या तुलनेत याचे दर दुप्पट आहेत. शुगर फ्री साधा पेढा ९६० रुपये किलो तर केसरयुक्त पेढा १२०० रुपये किलो या दराने विकला जातो. सध्या दररोज सरासरी २५ किलो शुगर फ्री’ कंदी पेढ्यांची विक्री ही दुकान व आॅनलाईनच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रासह कोलकाता, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, भोपाळ, दुबई या ठिकाणांहून याला मागणी आहे.

‘कंदी’चा रंजक इतिहास‘कंदी’ पेढ्याला सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवव्या वंशजांनी पूर्वी महाराष्ट्रात व आता कर्नाटक असलेल्या चिकोडी जवळील खडकलाट येथील लाटकरांची काही कुटुंबं साताºयात स्थलांतरित केली. ही कुटुंबं मिठाई बनविण्याचे काम करीत. तेव्हापासून साताºयात पेढा बनविला जाऊ लागला. ‘कंदी’ हे पेढा बनविण्याच्या तंत्रज्ञानाचं नाव आहे. हा पेढा तयार करताना त्याला दोन वेळा भाजलं जातं. भाजल्यामुळे त्यातीत आर्द्रता निघून जाते. तो खमंग व मऊ राहतो. त्याच्या भाजणीच्या प्रक्रियेलाच कंदी असे म्हटले जाते.असा होतो तयार...पेढा हा प्रामुुख्याने खवा आणि साखरेपासून बनविला जातो. हे दोन पदार्थ पेढ्यातील महत्त्वाचे घटक. मात्र, ‘शुगर फ्री’ कंदी पेढ्यात या दोन्हींचाही वापर केला जात नाही. केवळ दुधाचा वापर करून हा पेढा तयार केला जातो. त्यामध्ये जो गोडवा निर्माण होतो, तो दुधापासून येतो. सजावटीसाठी यामध्ये केसरचा उपयोग केला जातो.