शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सातारकर म्हणे... ‘लिफ्ट’ नको, चालतच जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:47 PM

जगदीश कोष्टी। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बहुतांश शासकीय कार्यालये, रुग्णालयांमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्येष्ठ ...

जगदीश कोष्टी।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बहुतांश शासकीय कार्यालये, रुग्णालयांमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विकलांग मंडळींनाही विनासायास एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाता येऊ लागले; पण व्यवस्थित निगा राखली जात नसल्याने मध्येच अडकून राहणे, अचानक खाली कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ‘लिफ्ट नको’ म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषदेमधील लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने मध्येच थांबणे, त्यामध्ये नागरिक अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी एका खासगी रुग्णालयामध्ये तर कहरच झाला. लिफ्टचे नियंत्रण सुटल्याने ती खाली कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. यामुळे लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.वाढती लोकसंख्या अन् शहरीकरणामुळे साताºयात बहुमजली इमारतींचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या नियमावलीनुसार तीनहून अधिक मजल्यांच्या इमारतींमध्ये लिफ्टची सक्ती केली आहे. बांधकाम व्यावसायिकही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिल्या जाणाºया सुविधांमध्ये लिफ्ट दाखवितात.बांधकाम करत असतानाच जिन्याच्या शेजारीच लिफ्टसाठी डक ठेवला जातो. त्यामुळे आज ना उद्या लिफ्ट येईल, याचा विचार करून अनेक ठिकाणी फ्लॅटची विक्री होते; पण कित्येक वर्षे लिफ्ट बसत नाही. अशा रिकाम्या जागेतून लहान मुले पडण्याचा धोका सर्वाधिकअसतो.विशेष म्हणजे, लिफ्टची जबाबदारी दिलेल्या कंपनीचे कर्मचारीही याबाबत बिनधास्त असल्याचे पाहायला मिळतात. फ्लॅटधारकांशी वाद घालतील; पण अपघात घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्याबाबत उदासिनता दाखवितात.शासकीय कार्यालये, दवाखान्यांमध्ये लिफ्ट चालविण्यासाठी कर्मचारीअसतो. त्यांना योग्य ते प्रशिक्षण असल्यामुळे लिफ्ट अडकलीच तर आतील नागरिकांना ते धीर देऊशकतात. योग्य त्या ठिकाणी निरोप देऊन मदत मागावू शकतात; पण खासगी इमारतीत अशा घटना खडल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांमध्ये भीतीचेवातावरण निर्माण होते. त्यामुळे लिफ्ट नको रे बाबा... चालत गेलेलं बरं म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे. लिफ्टच्या देखभालीसाठी एखाद्या कंपनीला करार केला जातो. कामाचा करार होईपर्यंत सर्वचजण गोडगोड बोलतात पण त्यानंतर कोणीही फिरत नसल्याचा अनुभव अनेकदा येत असतो.अत्याधुनिक उपकरणांचा अभावअनेक ठिकाणी केवळ लिफ्ट असते; परंतु बॅटरी बॅकअप नसल्याने वीज गेल्याबरोबरच त्या जागेवर थांबतात. तसेच एखाद्याकडून दरवाजा सुरू राहिलाच तर सूचना करणारी यंत्रणा असते; पण ती बसवलेलीच नसते. एखाद्या मजल्यावर लिफ्ट अर्धवट उघडी असल्यास ती खाली किंवा वर जात नाही. अत्याधुनिक यंत्रणाच नसल्याने वापरण्यात अडथळे येतात.