प्रजासत्ताकदिनी समाप्त : सायकलिंगचाही समावेश; ३५ हून अधिक होते सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने साताऱ्यातील ३५ हून अधिक नागरिकांनी ७२ किलोमीटर रनिंग केली, तसेच काहींनी सायकलिंगही पूर्ण केले. यामध्ये नोकरदार, डॉक्टर आणि व्यावसायिकांचा समावेश होता. दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास रनिंग आणि सायकलिंग पूर्ण झाले.
‘इंडिया प्राइड अल्ट्रा रन राइड’अंतर्गत साताऱ्यातील नागरिक यामध्ये सहभागी होतात. मागील वर्षी या राइडची सुरुवात झाली. यावर्षी ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिन होता. त्यामुळे ७२ किलोमीटर रनिंग आणि सायकलिंगचे आयोजन करण्यात आले होते. दि. २५ ला रात्री सव्वाआठ वाजता ७२ किलोमीटर धावण्यास सुरुवात झाली. राजवाडा, मंगळवार तळे, पुन्हा राजवाडा, पोलीस मुख्यालयमार्गे पोवई नाका असा हा मार्ग होता. हे पाच किलोमीटरचे अंतर होते. त्यासाठी एकूण १४ फेऱ्या मारण्यात आल्या. दि. २६ रोजी सकाळी धावणे थांबले.
सायकलिंगला २६ रोजी पहाटे चारला पोवई नाक्यावरून सुरुवात झाली. राजवाडा, मंगळवार तळे, परत पोलीस मुख्यालयमार्गे पोवई नाका व मीनाक्षी हॉस्पिटल ते पुन्हा पोवई नाका, असा साडेनऊ किलोमीटरचा मार्ग होता. अशा सात फेऱ्या मारण्यात आल्या. सकाळी आठपर्यंत सायकलिंग संपले.
या ‘इंडिया प्राइड अल्ट्रा रन राइड’मध्ये नवनाथ डिगे, सुभाष भोसले, सुनील पानसे, सुधीर पवार, रवींद्र जानकर, शैलेश शिंदे, तानाजी वगरे, राहुल शिंदे, नितीन कोलगे, अजय धुमाळ, किरण गेंजगे, एकनाथ धनवडे, विनय रावखंडे, पंकज नागोरी आदी सहभागी झाले होते.
चौकट :
आरोग्याबद्दलही जनजागृती...
कोरोना विषाणूमुळे जगातील सर्वच चित्र बदलले आहे. या कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्तीचे महत्त्व समोर आले. रोगप्रतिकारशक्ती असेल, तर आपण वाचू शकतो, हा एक आत्मविश्वास निर्माण झाला, तसेच त्याचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठीही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
फोटो दि.२७ सातारा रनिंग...
\\\\\\\\\\\\\\\\\\