शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

साताऱ्यात रविवारी विधी सेवा महाशिबीराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:44 IST

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसाताऱ्यात रविवारी विधी सेवा महाशिबीराचे आयोजनसातारा शहर व परिसरातील एकूण ६० शाळा, महाविद्यालये सहभागी

सातारा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कुंभोजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्याशी निगडीत शासनाच्या सेवा योजना, कायदे, नियम यांची माहिती नसल्याने अनेकवेळा ते हक्क मिळविण्यापासून वंचित राहतात म्हणून विद्यार्थी आणि पालकांना त्यांचे हक्क आणि अधिकार तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी, यासाठी, यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाशिबीराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश केतकर, पालक न्यायमूर्ती सातारा जिल्हा महेश सोनके यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.शिबीरामध्ये एकूण १९ शासकीय विभागांचा सहभाग असणार असून विद्यार्थी आणि पालकांसाठी विविध शासकीय विभागांमार्फत स्टॉलच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. सातारा शहर व परिसरातील एकूण ६० शाळा, महाविद्यालये सहभागी होणार आहेत. अंदाजे ९ हजार विद्यार्थी व पालक याचा लाभ घेणार आहेत. या महाशिबीरात काही दाखलेही वितरित केले जाणार आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसर