शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election: मंद्रुळकोळे गटात सर्वाधिक, तळदेवमध्ये सर्वात कमी मतदार

By नितीन काळेल | Updated: December 9, 2025 19:51 IST

२१ लाख ९१ हजारांवर मतदारांची नोंद; अंतिम यादी लवकरच

नितीन काळेलसातारा : जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी निवडणूक होणार असून प्रारूप यादीनुसार पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे गटात सर्वाधिक ४३ हजारांवर तर महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटात सर्वांत कमी म्हणजे १७ हजारांहून अधिक मतदार असतील. तसेच जिल्ह्यातील सर्व ६५ गटांतील एकूण मतदारांची संख्या २१ लाख ९१ हजारांवर आहे. तरीही अंतिम यादीनुसार मतदार संख्येत काही बदल होऊ शकतो.जिल्हा परिषदेची निवडणूक आता तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. यापूर्वी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान झाले होते. मार्च २०२२ मध्ये पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींचा कारभार प्रशासकाकडे गेला. मागील पावणे चार वर्षांपासून प्रशासक राजवट आहे.आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार असल्याने प्रशासकांची राजवटही संपणार आहे. तर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची अंतिम रचना होऊन आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. तर या निवडणुकीसाठी गट आणि गणनिहाय मतदारांची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. गटांसाठी २१ लाख ९१ हजार ३७४ मतदार आहेत.सातारा जिल्हा परिषदेसाठी एकूण ६५ गट आहेत. तर ११ पंचायत समितीत १३० गण आहेत. यामध्ये सर्वाधिक गटांची संख्या कराड तालुक्यात १२ आहे. तर सर्वात कमी गट हे महाबळेश्वर तालुक्यात अवघे दोन आहेत. या गटांतील प्रारूप मतदार यादीनुसार पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे गटात सर्वाधिक ४३ हजार २१४ मतदार आहेत.तर सर्वांत कमी मतदार हे महाबळेश्वर तालुक्याच्या तळदेव गटात १७ हजार ५२५ आहेत. महाबळेश्वर तालुक्यात भिलार गटही आहे. या गटातील मतदारसंख्याही कमीच आहे. प्रारुपनुसार भिलार गटात १८ हजार ७३२ मतदार आहेत. जिल्ह्यातील गटांतील मतदारांचा विचार करता १७ हजार ते ४३ हजारांवर एका गटात मतदार आहेत. तर पाटण तालुक्यातील अनेक गटात अधिक मतदारसंख्या आहे.

जिल्हा परिषद गट - पंचायत समिती गणवाई- ०४ ०८महाबळेश्वर- ०२ ०४खंडाळा- ०३ ०६फलटण- ०८ १६माण- ०५ १०खटाव- ०७ १४कोरेगाव- ०६ १२सातारा- ०८ १६जावळी- ०३ ०६पाटण- ०७ १४कऱ्हाड- १२ २४

प्रारुपनुसार सर्वाधिक मतदारांचे गट...तालुका गट - मतदार संख्यापाटण मंद्रुळकोळे - ४३,२१४पाटण काळगाव - ४२,६६७सातारा वर्णे - ४१,१००सातारा लिंब - ४०,६९९पाटण मल्हारपेठ - ३९,४४१पाटण मारुल हवेली - ३८,९५५माण कुकुडवाड - ३८,२९१

English
हिंदी सारांश
Web Title : Satara ZP Election: Mandrule Kole Has Most, Taldev Least Voters

Web Summary : Satara Zilla Parishad's 65 constituencies have varying voter counts. Mandrule Kole boasts 43,000+ voters, while Taldev has just over 17,000. Total voters exceed 21 lakhs; final numbers may change.