शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद भरती परीक्षेला शनिवारपासून मुहुर्त; पहिला टप्पा : ११ ऑक्टोबरपर्यंत आठ संवर्गासाठी परीक्षा 

By नितीन काळेल | Updated: October 4, 2023 19:43 IST

परीक्षेसाठी उमेदवारांना सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील लिंकवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यायचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा जिल्हा परिषद भरती प्रक्रियेतील परीक्षेस मुहुर्त लागला असून शनिवार, दि. ७ आॅक्टोबरपासून याची सुरूवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात आठ संवर्गासाठी परीक्षा होत असून ती ११ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदाच्या भरतीबाबत पात्र उमदेवारांकडून ५ ते २५ आॅगस्टदरम्यान आॅनलाइन पध्दतीने अर्ज मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील भरतीसाठी ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या भरती प्रक्रियेची परीक्षा शनिवार दि. ७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आठ संवर्गासाठी परीक्षा होत आहे. यामध्ये शनिवार दि. ७ रोजी रिंगमन (दोरखंडवाला) आणि वरिष्ठ सहायक (लेखा) परीक्षा होणार आहे. तर ८ आॅक्टोबरला विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि दि. १० रोजी विस्तार अधिकारी (कृषी) तसेच आरोग्य पर्यवेक्षकची परीक्षा होईल. त्याचबरोबर ११ आॅक्टोबर लघुलेखकची निम्न आणि उच्चश्रेणी तसेच कनिष्ठ सहायक लेखाची परीक्षा होणार आहे.

या परीक्षेसाठी उमेदवारांना सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील लिंकवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात एक डेमोलिंकही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.जिल्हा परिषदेचे आवाहन...सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित सूचनांव्यतिरिक्त अन्य अफवांवर विश्वास ठेवू नये. या भरीतच्या अनुषंगाने संकेतस्थळावर वेळोवळी सूचना प्रसारित केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी सातारा जिल्हा परिषद संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. तसेच उमेदवारांनी समाजविघातकांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर