शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा परिषदेला मिळाल्या प्रथमच आयएएस महिला अधिकारी

By नितीन काळेल | Updated: February 5, 2024 21:53 IST

३६ व्या सीईओ : याशनी नागराजन आज पदभार घेणार; ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली 

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली आहे. नागराजन या मंगळवारीच पदभार स्वीकारणार आहेत. तर यामुळे जिल्हा परिषदेला प्रथमच महिला आएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे. नगाराजन या आता ३६ व्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ज्ञानेश्वर खिलारी यांची सवा वर्षापूर्वी नियुक्ती झाली होती. त्यांनी सर्व विभागात समन्वय ठेवून कामे केली. घरकुल तसेच शिक्षण, आरोग्य विभागातील अनेक विषय मार्गी लावले. आता त्यांची बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झाली आहे. खिलारी यांच्या जागी याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली. नागराजन या २०२० च्या आएएस अधिकारी आहेत. सध्या त्या यवतमाळ जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तसेच पांढरकवडा येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी होत्या. तेथून त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्या सातारच्या ३६ व्या तसेच पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या आहेत. मंगळवारी त्या पदभार घेणार आहेत. त्या तमिळनाडू राज्यातील आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय रिझर्व बॅंक तसेच विदेशन मंत्रालयातही काम केले आहे.

सातारा जिल्ह्यात काम करण्यासारखे खूप आहे. कृषी क्षेत्रातही काम करण्यासाठी वाव आहे. मिळणाऱ्या कार्यकालात लोकांची कामे मार्गी लावण्याला प्राधान्य असेल. त्याचबरोबर महिला आणि शाळा या विषयीही अधिक कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.- याशनी नागराजन, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर