शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:23 IST

शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी गडावर गेलेला पाचपुतेवाडी (ता. वाई) येथील युवक टेम्पोच्या धडकेत ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. स्वप्नील अरविंद चव्हाण (वय २७) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला.

ठळक मुद्देशिवज्योत आणण्यासाठी गेलेला वाईतील युवक अपघातात ठारदोघे जखमी : पाचपुतेवाडी गावावर शोककळा

सातारा/वाई : शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी गडावर गेलेला पाचपुतेवाडी (ता. वाई) येथील युवक टेम्पोच्या धडकेत ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. स्वप्नील अरविंद चव्हाण (वय २७) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचपुतेवाडी येथे मंगळवारी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शिवजयंती मंडळाचे काही कार्यकर्ते सोमवारी दुपारी टेम्पो करून शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी गडावर गेले होते. यामध्ये स्वप्नीलचाही समावेश होता.गडावर शिवज्योत पेटवून कार्यकर्ते पुन्हा पाचपुतेवाडीकडे निघाले होते. मध्यरात्री सवा बारा वाजण्याच्या सुमारास वासी गावच्या हद्दीत स्वप्नील चव्हाण, अमर पाचपुते (वय २५) व विनायक गोळे (२६) हे तीघे दुचाकीजवळ शिवज्योतीमध्ये तेल घालण्यासाठी थांबल होते. याचवेळी नाशिकहून पुण्याकडे निघालेल्या एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोेरदार धडक दिली.या अपघातात स्वप्नील चव्हाण, अमर पाचपुते व विनायक गोळे तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून टेम्पोसह पोबारा केला. स्वप्नील हा पिंपरी चिंचवड येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. तो या ठिकाणी आपल्या बहिणीच्या घरी राहत होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने पाचपुतेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८