शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वीज जाताच काळजात होते धस्स...! शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 13:42 IST

वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियम सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच लोकांच्या काळजात धस्स होत आहे.

ठळक मुद्देवीज जाताच काळजात होते धस्स...! शेतकरी चिंताग्रस्त वर्ये, धावडशी परिसरात अघोषित भारनियमन

सातारा : वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियमन सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच लोकांच्या काळजात धस्स होत आहे.जिल्ह्यात कुठेही भारनियमन घोषित केलेले नाही. तरी देखील काही भागांत जाणीवपूर्वक वीज घालविण्याचे प्रकार होत आहेत. ह्यवर्ये फिडरची वीज गळती जास्त आहे, असे कारण पुढे करुन भारनियमनचा आसूड ओढला जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून रामनगर, वर्ये, पानमळेवाडी, सैदापूर, कोंडवे, नेले, किडगाव, धावडशी, पिंंपळवाडी, म्हसवे या गावांत रोज सकाळी ८ ते दुपारी २.३0 असे साडेचार तासांचे भारनियमन सुरु आहे.

या परिसरात शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. वेण्णा नदी याच परिसरातून वाहत असल्याने शेतीमध्ये बागायती पिके तसेच ऊसाची लागणही मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. या पिकांना पाणी लागते. पाण्याविना पिके करपू लागली आहेत. भारनियमनामुळे पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे.दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने उकाड्यापासून बचावासाठी पंखे, एअर कुलरचा वापर केला जातो, यासाठी वीज लागते. मात्र वीजच नसल्याने ही यंत्रणा बंद पडून लोकांचे हाल होताना दिसत आहेत.

मुलांच्या परीक्षेचा कालावधी सुरु आहे, त्यातच या परिसरातील बहुतांश गावांच्या यात्रा सध्या सुरु असल्याने वीज महत्त्वाची ठरते. मात्र याचा विचार भारनियमन करताना केलेला दिसत नाही. हॉटेल व्यावसायिकांचे फ्रिज बंद राहत असल्याने पाणी, कोल्ड्रिंक्स थंड ठेवण्यासाठी व्यावसायिक बर्फाच्या लाद्या विकत आणताना दिसत आहेत.वेळेत बिले भरणाºयांवरही अन्यायवर्ये फिडरच्या माध्यमातून ज्यांना वीज मिळते, त्यापैकी बहुतांश ग्राहक हे वेळेत वीज बिल भरतात, मग वीज गळतीचे पाप त्यांच्या माथी मारण्याचे कारस्थान का खेळले जात आहे?, तसेच इथली वीज वाचवून दुसरीकडे तिचा वापर केला जात आहे का?, असे प्रश्न वीज ग्राहकांना पडले आहेत.

एका विहिरीवरुन वार लावून पाणी घ्यावे लागते. साहजिकच अनेक शेतकरी एकाच विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असतात. रोज साडेचार तास सक्तीने वीज जात असल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत.- संभाजी पवार,शेतकरी

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण