शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

सातारा : पवारांचे ऐकून घ्यायला आम्ही दूधखुळे नाही : लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:30 IST

पवारांचे ऐकून निर्णय घ्यायला आम्ही दुधखुळे नाही. अनेक निर्णयांमध्ये पवार आमचा सल्ला घेतात. आम्ही नाही तर पवारच आमचे ऐकतात. त्यांच्या सल्ल्याने वंचित आघाडीची वाटचाल सुरु असल्याची चर्चा फोल आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन महाआघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी केले.

ठळक मुद्देपवारांचे ऐकून घ्यायला आम्ही दूधखुळे नाही : लक्ष्मण माने काँग्रेस आघाडीशी बोलणी फिस्कटली तर ४८ जागी लढणार

सातारा : पवारांचे ऐकून निर्णय घ्यायला आम्ही दुधखुळे नाही. अनेक निर्णयांमध्ये पवार आमचा सल्ला घेतात. आम्ही नाही तर पवारच आमचे ऐकतात. त्यांच्या सल्ल्याने वंचित आघाडीची वाटचाल सुरु असल्याची चर्चा फोल आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन महाआघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी केले.येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने म्हणाले, जातीयवादी पक्षांना बाजूला सारुन आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या विचारांच्या पक्षांशी मैत्रीसाठी हात पुढे केले आहेत. जून महिन्यांपासून आम्हाला चर्चेला बोलावले जाईल, याच्या प्रतीक्षेत आहोत.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याबाबत वेगवेगळी वक्तव्य करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार मात्र मैत्रीसाठी इच्छूक आहेत. आमच्याकडे सोयीस्कर पर्याय येणे आवश्यक आहे. १२ जागांची मागणी आम्ही केलेली आहे. ज्यांना वाटते की आम्हाला नादी लावणे सोपे आहे, त्यांनी हे लक्षात घ्यावे की आता दिवस बदलले आहेत.वंचित आघाडीला कुठल्या जागा हव्यात, याबाबत स्पष्टीकरण करताना माने म्हणाले, ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार तीन ते चार वेळा पराभूत झाले आहेत, पुन्हा निवडून येण्याची शक्यताही नाही, अशाच जागा आम्ही मागत आहोत. गरीब लोकांनीच भाजपला सत्तेवर आणले आहे. आता हेच लोक भाजपला सत्तेवरुन खाली खेचतील.एमआयएमशी केलेली युती कुठल्याही परिस्थितीत तोडणार नाही, असे स्पष्ट करत माने यांनी आरएसएसवर तोफ डागली. एमआयएम पक्ष हा जातीयवादी म्हणणाऱ्या आरएसएसच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. मुस्लिम, ख्रिश्चन हे भारतीय नागरिक आहेत, हे मानायला आरएसएस तयार नाही, मात्र आम्ही मुस्लिम, मराठा, ओबीसींसह सर्वच वंचितांना सोबत घेणार आहोत, असेही माने यांनी सांगितले.वंचित आघाडी १२ जागांवर ठामकाँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच जे डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत, त्यांच्याशी आघाडी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी इच्छूक आहे. आम्ही जून महिन्यात काँग्रेसकडे प्रस्ताव सादर केला होता. १२ जागांची आम्ही मागणी केली आहे, काँग्रेसने जर याबाबत नकार दर्शविला तर आम्ही स्वतंत्रपणे ४८ जागांवर उमेदवार उभे करुन लोकसभा निवडणूक लढवू, असा इशाराही माने यांनी दिला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण