शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : लोणंदकडे जाणारी वाहने पारगावच्या स्मशानभूमीत, दिशादर्शक फलकामुळे फसगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:19 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव, ता. खंडाळा येथे गावांची दिशा दर्शविणारा सूचनाफलक चुकीच्या पद्धतीने लावला गेल्याने वाहन चालकांची दिशाभूल होत आहे. परिणामी लोणंदकडे जाणारी अनेक वाहने चक्क पारगावच्या स्मशानभूमीत पोहोचत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देदिशादर्शक फलकामुळे फसगत राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या पद्धतीने लावला

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव, ता. खंडाळा येथे गावांची दिशा दर्शविणारा सूचनाफलक चुकीच्या पद्धतीने लावला गेल्याने वाहन चालकांची दिशाभूल होत आहे. परिणामी लोणंदकडे जाणारी अनेक वाहने चक्क पारगावच्या स्मशानभूमीत पोहोचत असल्याचे दिसत आहे.महामार्गावरून लोणंदकडे जाणाऱ्या वाहनचालकांना रस्ता लक्षात यावा, यासाठी गावांच्या नावासह दिशा दाखवणारा सूचना फलक लावण्यात आला आहे. या फलकावरील लोणंदकडे जाणारा बाण लक्षात घेऊन अनेक वाहनचालक लगेचच वळण घेऊन पारगावमधून पुढे जातात.

पारगावमधून गावाबाहेर हा रस्ता स्मशानभूमीकडे जातो. त्यानंतर रस्त्याची चूक लक्षात आल्यावर वाहने परत महामार्गाकडे येतात. विशेषत: रात्रीच्या वेळी अनेकांची फसगत होते. वास्तविक हा सगळा प्रकार सूचना फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने होत आहे.

मात्र, हायवे प्रशासनाच्या या कामगिरीचा नाहक त्रास वाहनचालकांना आणि स्थानिक ग्रामस्थांनाही होत असतो. त्यामुळे हा फलक महामार्गावरील पारगावच्या ओढ्यावरील पूल ओलांडल्यानंतर लावण्यात यावा अथवा बाण चिन्हाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा