शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : गोंदवलेत कोठी पूजनाला साकारली अनोखी कलाकृती, ब्रह्मचैतन्य महाराज समाधी सजवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 13:22 IST

गोंदवले येथील श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या १0५ व्या पुण्यतिथी महोत्सवाला रविवारी पासून पहाटे कोठी पूजनाने सुरुवात झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठी पुजनानिमित्त फळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक रचनेतून बनवलेली आरास पाहण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देगोंदवलेत कोठी पूजनाला साकारली अनोखी कलाकृती, ब्रह्मचैतन्य महाराज समाधी सजवलीफळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक, रचनेतून बनवली आरास

म्हसवड : गोंदवले येथील श्री ब्रम्हचैतन्य महाराजांच्या १0५ व्या पुण्यतिथी महोत्सवाला रविवारी पासून पहाटे कोठी पूजनाने सुरुवात झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठी पुजनानिमित्त फळे, भाज्या, भांड्यांच्या आकर्षक रचनेतून बनवलेली आरास पाहण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.ब्रम्हानंद महाराजांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसारच येथील समाधी मंदिर समितीच्या वतीने मार्गशिर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमी पर्यंत श्रींचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पहाटे समाधी मंदिर परिसरातील मुख्य सभामंडपात सकाळी साडेसहा वाजता वेदघोष ईशस्तवन आणि सुमधूर गायनाने सुरुवात झाली, त्यानंतर श्री ब्रम्हचैतन्य महाराज व श्री ब्रम्हानंद महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

समाधी मंदिर समितीचे विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे मध दुध दही चंदन पंचामृत याने लेप देत गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. पूजन झाल्यानंतर अक्षय पिशवीतील पैशाना पंचामृताने अभिषेक घालून विधीवत पूजन करण्यात आले. गोशाळेत गाईंचे पूजन करण्यात आले. त्यांना प्रसाद खाऊ घालण्यात आला, तसेच कोठीपूजन करण्यात आले. स्वयंपाकघरातील चुलींचे देखील पूजन करण्यात आले.स्वयंपाक गृहात स्वयंपाकसाठी लागणाऱ्या ताट मोठी पातेली, वाट्या, चमच्या, पळी भात वाडी यां वस्तूंची आरास करण्यात आली. स्वयंपाकघरातही भट्ट्यांचे पूजन करण्यात आले. तसेच कडधान्य यांची दैदिप्यमान आरास करण्यात आली होती.

यावेळी सुमारे तेराशे मक्याची कणसाचा वापर करून एक नऊ फूट उंच कणसाची प्रतिकृती तयार करून त्यात कोणताही कृत्रिम रंग ना लावता काही ठिकाणी कमी अधिक भाजून हुबेहूब सुंदर अशी श्री ब्रम्हचैतन्य महाराजांची कलाकृती बनवण्यात आली असून त्याच्या साईडला हिरव्या मक्याच्या ताटांची आरास बघण्यासाठी खूप गर्दी केली होती. ही कलाकृती चिंचवड येथील प्रशांत कुलकर्णी यांनी साकारली आहे. मंदिरात सुध्दा फुलांची आरास केली होतीकोठीपूजनाच्या या कार्यक्रमानंतर मुख्य समाधी मंदिरात अखंड पहारा बसविण्यात आला.आरास पाहण्यासाठी गर्दीकोठीपूजनानिमित्त यंदाही कोठीमध्ये डाळींब, ढब्बू मिरची, संत्री, केळी, दांगदा, टोमॅटो, अननस आणि विविध वस्तू फळे भाज्यांच्या वापरातून आकर्षक आरास करण्यात आली होती. स्वयंपाकघरातही विविध लहानमोठी भांडी व वस्तूवापरुन आकर्षक मांडणी करण्यात आली होती. या आरास पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेSatara areaसातारा परिसर