शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : अतिक्रमणविरोधी पथकाचे रांगोळी काढून अन् औक्षण करुन स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 17:07 IST

कऱ्हाड येथील शनिवार पेठेतील शिंदे गल्लीत आशिष मधुकर रैनाक यांच्या घरावर पालिकेच्या वतीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता कारवाई केली. विशेष म्हणजे पोलीस, अधिकारी कारवाई करण्यासाठी यंत्रणा घेऊन आले असता रैनाक व त्यांच्या आईने अंगणात रांगोळी काढून शाल, श्रीफळ देऊन अधिकाऱ्यांचे स्वागत केले. अन्यायकारक कारवाईचा त्यांनी गांधीगिरी करत निषेध केला.

ठळक मुद्देअतिक्रमणविरोधी पथकाचे रांगोळी काढून अन् औक्षण करुन स्वागतकऱ्हाडात गांधीगिरी : पालिकेकडून अन्यायकारक कारवाई होत असल्याचा आरोप

कऱ्हाड : येथील शनिवार पेठेतील शिंदे गल्लीत आशिष मधुकर रैनाक यांच्या घरावर पालिकेच्या वतीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता कारवाई केली. विशेष म्हणजे पोलीस, अधिकारी कारवाई करण्यासाठी यंत्रणा घेऊन आले असता रैनाक व त्यांच्या आईने अंगणात रांगोळी काढून शाल, श्रीफळ देऊन अतिक्रमणविरोधी पथक अधिकाऱ्यांचे स्वागत केले. अन्यायकारक कारवाईचा त्यांनी गांधीगिरी करत निषेध केला.याबाबत माहिती अशी की, कऱ्हाड येथील शनिवार पेठेतील शिंदे गल्लीत आशिष रैनाक आई-वडिल, पत्नी, लहान भाऊ यांच्या समवेत राहतात. पालिकेकडून सात दिवसांपूर्वी कारवाईची नोटीस दिली होती.

आशिष यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केल्यावर त्यांना समजले की, शहरातील १ हजार २३ जणांना नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामात पाच विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे.आशिष हे मंगळवारी सकाळी गरोदर पत्नीस दवाखान्यात घेऊन गेले होते. इतरांचे बांधकाम सोडून रैनाक यांच्याच घरावर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यंत्रणा घेऊन दाखल झाले. यामुळे संतप्त झालेल्या रैनाक यांनी गांधीगिरी करत राग व्यक्त केला. अंगणात रांगोळी काढून येणाऱ्या अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.यापूर्वी आत्मदहनाचाही प्रयत्नआशिष रैनाक यांनी शहरातील अनधिकृत बांधकाम विरोधात पालिकेत २६ जानेवारी रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका