शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : कुत्र्यांचा पाठलाग चुकविताना भेकर जलतरण तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 19:05 IST

कुत्र्यांचा पाठलाग चुकविताना एक भेकर महाबळेश्वर शहरात घुसले. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना ते छत्रपती शिवाजी चौकातील सांस्कृतिक भवनामधील बंद जलतरण तलावात पडले.

ठळक मुद्देजखमी अवस्थेतील भेकर जलतरण तलावात श्वानांच्या नखांनी भेकराच्या अंगावर जखमा

महाबळेश्वर : कुत्र्यांचा पाठलाग चुकविताना एक भेकर महाबळेश्वर शहरात घुसले. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना ते छत्रपती शिवाजी चौकातील सांस्कृतिक भवनामधील बंद जलतरण तलावात पडले.याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वर परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर जंगली प्राणी आहेत. ते अन्न व पाण्याच्या शोधात शहरानजीक येतात. असेच एक भेकर गुरुवारी दुपारी शहर परिसरात आले. यावेळी कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यामुळे घाबरलेले भेकर शहरात इकडे तिकडे धावत होते. अन् त्यातून चुकून बंद अवस्थेतील जलतरण तलावात पडले.

ही घटना प्राणीमित्र राहुल लोहार व त्यांच्या मित्रांनी पहिली. त्यांनी याची माहिती वनविभागास दिली. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील भेकर जलतरण तलावात पोहण्याचा प्रयत्न करीत असलेले दिसले. त्यांनी प्राणी मित्रांच्या मदतीने विनाविलंब पाण्यात उतरून भेकराला बाहेर काढले.

साधारण आठ ते नऊ महिन्यांचे भेकर होते. श्वानांच्या नखांनी भेकराच्या अंगावर तर पळाल्यामुळे पुढील दोन्ही पायांच्या नखांनाही मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. वन विभागाने त्यास हिरडा विश्रामगृहात पिंजऱ्यांमध्ये ठेवले. त्याच्यावर उपचार करून सायंकाळी त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांनी दिली.

 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग