शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सातारा : म्हसवडला निषेध फेरी अन् रास्ता रोको, पुतळा विटंबनाचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:41 IST

पंढरपूर येथे थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथील काही सामाजिक संघटनांनी म्हसवड बंदची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी म्हसवड शहरातून निषेध रॅली काढून बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. सातारा-पंढरपूर मार्ग काहीकाळ रोखून धरला.

ठळक मुद्देम्हसवडला निषेध फेरी अन् रास्ता रोको, पुतळा विटंबनाचे पडसादसमाजकंटकांवर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाईची मागणी

म्हसवड (सातारा) : पंढरपूर येथे थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथील काही सामाजिक संघटनांनी म्हसवड बंदची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी म्हसवड शहरातून निषेध रॅली काढून बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. सातारा-पंढरपूर मार्ग काहीकाळ रोखून धरला.पंढरपूर येथे ९ आॅगस्टला काही समाजकंटकांनी थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच संबंधितांना शोधून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी. या मागणीसाठी काही सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी म्हसवड बंद, मोर्चा व रास्ता रोको करण्यात आला.येथील रिंगावण पेठ मैदानापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा सिद्धनाथ मंदिर, शिवाजी चौक, रामोशी वेस, सातारा-पंढरपूर रस्त्यावरून बसस्थानक चौक ते शिंगणापूर चौकात आला. बसस्थानक चौकात निषेध सभा घेत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी निषेध सभेत समाजकंटकांवर कडक कारवाई करून अशा घटना परत राज्यात होऊ नयेत, याची दक्षता राज्य शासन व पोलिसांनी घ्यावी, अन्यथा उग्र आंदोलने करावी लागतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी महेश लोखंडे, शिवाजी लोखंडे, भीमराव लोखंडे, दिलीप तुपे, धर्मराज लोखंडे, संभाजी लोखंडे, डॉ. प्रमोद गावडे, किशोर सोनवणे,अनिल लोखंडे, उमेश लोखंडे, जगन्नाथ लोखंडे, शहाजी लोखंडे, धनाजी तुपे, सदाशिव लोखंडे, बाबू लोखंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.व्यापाऱ्यांकडून दुकाने बंदपुतळा विटंबना निषेधार्थ शनिवारी व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के बंद यशस्वी झाला. यावेळी म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Chakka jamचक्काजामSatara areaसातारा परिसर