शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : नगरमधील शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:57 IST

अहमदनगर येथील शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्यावतीने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली.

ठळक मुद्देनगरमधील शिवसैनिकांच्या हत्येचा निषेध साताऱ्यात शिवसेनेचा मोर्चा

सातारा : अहमदनगर येथील शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्यावतीने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली.जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये केडगाव, अहमदनगर येथील पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची निघृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशीसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात आणण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करुन जगताप यांना नेले. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.मोर्चात उपजिल्हा प्रमुख हरीदास जगदाळे, तालुका प्रमुख दत्ता नलवडे, आकाश जाधव, स्वप्नील मुळीक, गिरीश सावंत, रमेश बोराटे, सचिन गायकवाड, बाळासाहेब शिंदे, सचिन जवळ, संभाजी शिंदे, शिवाजी पवार, सचिन जगताप व शिवसैनिक सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAhmednagarअहमदनगरMurderखून