शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : महसूल विभाग दखल घेत नसल्याने शेतकऱ्याचे विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 16:44 IST

शेतात जायला रस्ता मिळत नाही, आणि महसूल विभागही मागणीची दखल घेत नाही, या कात्रीत सापडलेल्या सातारा तालुक्यातील तारगावच्या शेतकऱ्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातच विषारी औषध पिले. सुनील संपत मोरे (वय ३५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देमहसूल विभाग दखल घेत नसल्याने शेतकऱ्याचे विष प्राशन

सातारा : शेतात जायला रस्ता मिळत नाही, आणि महसूल विभागही मागणीची दखल घेत नाही, या कात्रीत सापडलेल्या सातारा तालुक्यातील तारगावच्या शेतकऱ्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातच विषारी औषध पिले. सुनील संपत मोरे (वय ३५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.मोरे यांना शेतातून जाण्यासाठी रस्ता नव्हता. कोरेगाव तहसीलदार कार्यालयाकडे त्यांनी रस्ता मिळण्यासाठी मागणी केली. या मागणीसाठी तहसील कार्यालयात अनेकदा खेटे मारले, मात्र त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. याच संदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरु होती.आपल्याला न्याय मिळेल का? या विवंचनेत असणाऱ्या सुनील मोरे यांनी या कार्यालयाच्या आवारातच विष घेतले. महसूल विभागातील वाहनचालक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरु आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorतहसीलदार