शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :  सोनगाव ग्रामस्थांनी पुन्हा रोखल्या घंटागाड्या, कचरा डेपोतील धूर थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:41 IST

गेल्या तीन दिवसांपासून धुमसत असलेल्या सोनगाव कचरा डेपोतील धुराचा प्रश्न सोमवारीही जैसे थे होता. आंदोलन करूनही डेपोतील धूर न थांबल्याने ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले.

ठळक मुद्देसोनगाव ग्रामस्थांनी पुन्हा रोखल्या घंटागाड्याकचरा डेपोतील धूर थांबता थांबेना

शेंद्रे : गेल्या तीन दिवसांपासून धुमसत असलेल्या सोनगाव कचरा डेपोतील धुराचा प्रश्न सोमवारीही जैसे थे होता. आंदोलन करूनही डेपोतील धूर न थांबल्याने ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले.डेपोच्या बाहेर सर्व घंटागाड्या अडवून ठेवून आधी धूर थांबवा मगच कचरा टाका अशी भूमीका ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान, मुख्याधिकारी शंकर गोरे व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.सोनगाव येथील कचरा डेपोला शुक्रवारी सायंकाळी आग लागली आहे. शनिवारी व रविवारी दिवसभर ही आग सुरूच होती. आगीमुळे सुमारे दहा किलोमीटर क्षेत्रात धुराचे लोट हवेबरोबरच पसरत होते.

ऐन दिवाळीत डेपोतील कचरा पेटल्याने परिसरातील हजारो ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. पालिकेकडून कोणतीच उपाययोजना न केल्याने रविवारी सकाळी सोनगाव, जकातवाडी व डबेवाडी परिसरातील ग्रामस्थ सोनगाव डेपोजवळ एकत्र आले होते. या ठिकाणी त्यांनी घंटागाड्या अडवून धूर तातडीने थांबविण्याची मागणी केली होती.या आंदोलनानंतर पालिकेच्या अग्निशामक विभागाकडून आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आग आटोक्यात आली नाही. सोमवारी सकाळी डेपोतून धुराचे लोट येऊ लागल्याने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले. बोगद्यातून डेपोकडे येणाऱ्या सर्वच घंटागाड्या ग्रामस्थांनी रस्त्यावर अडवून ठेवल्या.

या आंदोलनाची माहिती मिळताच मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या अडणची समजून घेऊन यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्याधिकारी गोरे यांनी दिले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर