शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा रॅलीमध्ये साडेआठ लाखांचा डल्ला-: चोरट्यांनी केले हात साफ, अनेकांचे खिसे झाले रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 11:36 IST

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती.

ठळक मुद्दे गर्दीचा गैरफायदा

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. जमलेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी ३३ तोळे सोने व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. चोरट्यांनी हात साफ केल्याने कार्यकर्त्यांचे खिसेच रिकामे झाले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह जिल्ह्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गांधी मैदानात जमले होते. उदयनराजेंची राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढली होती. यासाठी सातारा शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

मात्र, उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन साताºयात मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी फिल्डिंग लावली होती. रॅलीत जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी अनेकांना धक्का देत गळ्यातील सोन्याची चेन व खिशातील रोकड चोरून हात साफ केले. गर्दीमध्ये चेन व पॉकेट खाली पडले असावे, म्हणून कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, अनेकजण अशाप्रकारे शोधाशोध करत असल्याचे पाहून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अनेकांनी रॅली अर्धवट सोडून थेट पोलीस ठाणे गाठले. मात्र, ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात असल्याने तक्रार घ्यायची कोणी? असा प्रश्न निर्माण झाला होता. दुपारपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेकांनी ठाण्यासमोर गर्दी केली होती.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडून तक्रारी घेण्यात आल्या. शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रवीण उत्तम  कांबळे यांनी तक्रार दिली. यामध्ये गांधी मैदान ते सिटी पोस्ट आॅफिसदरम्यान चोरट्यांनी सात तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावली. त्यांच्याप्रमाणे प्रमोद कांबळे यांची तीन तोळे, योगेश हणमंत गुरव यांची दोन तोळे, संतोष देवरे यांची दोन तोळे, आनंद निकम यांचे एक तोळे, अजय चव्हाण यांची दोन तोळे, संदीप बाबर यांची सहा तोळे, सुरेश दगडू शिर्के  (रा. किकली, ता. वाई) यांच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोकड, माजी नगराध्यक्ष प्रकाश कोंडिराम गवळी (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोनेची चेन चोरून नेली. असा एकूण २६ तोळे सोने व ७ हजार रुपये रोकड मिळून ६ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

तर सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कमानी हौद ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान अजय यशंवत भोसले यांचे तीन तोळे, अशोक रामचंद्र पवार यांची दोन तोळे, बिभिषण लक्ष्मण कांबळे यांची १३ हजार रुपये रोख, गणेश सतीश नलवडे यांची १८ ग्रॅम सोन्याची चेन असा नऊ तोळे सोने व १३ हजार रुपयांची रोकड मिळून १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकूण १३ जणांनी तक्रारी दिल्या. त्यानुसार सुमारे ८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. या घटनेची पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, रॅली मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

टॅग्स :satara-pcसाताराPoliticsराजकारण