शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पुणे-आदर्की-मिरज रेल्वेलाईन दुहेरीकरणाच्या कामाला गती, दळणवळणाचा मार्ग बनणार सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 18:07 IST

ब्रिटिशकाळात सुरू झालेली पुणे-आदर्की-मिरज रेल्वेलाईनची मीटर गेज सुरू झाली. त्यानंतर स्वातंत्र्यात ब्रॉड गेज रेल्वेलाईन सुरू झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारीला वाहतुकीचा मार्ग सुकर झाला. आता ब्रॉड गेज लाईनचे दुहेरीकरणात मातीचे भराव टाकण्याचे काम जागोजागी सुरू झाल्याने आता मालवाहतुकीबरोबर प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

ठळक मुद्दे: मालवाहतुकीबरोबर प्रवाशांचा वेळही वाचणारपुणे-आदर्की-मिरज रेल्वेलाईन दुहेरीकरणाच्या कामाला गतीदळणवळणाचा मार्ग बनणार सुकर

आदर्की : ब्रिटिशकाळात सुरू झालेली पुणे-आदर्की-मिरज रेल्वेलाईनची मीटर गेज सुरू झाली. त्यानंतर स्वातंत्र्यात ब्रॉड गेज रेल्वेलाईन सुरू झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारीला वाहतुकीचा मार्ग सुकर झाला. आता ब्रॉड गेज लाईनचे दुहेरीकरणात मातीचे भराव टाकण्याचे काम जागोजागी सुरू झाल्याने आता मालवाहतुकीबरोबर प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, मिरज, सांगली, कोल्हापूर जिल्हे रेल्वे लाईनने जोडण्यासाठी ब्रिटिशकाळात पुणे-मिरज रेल्वेलाईन टाकताना पुणे, घोरपडी, राजेवाडी, जेजुरी, धोंडज, वाल्हे, नीरा, लोणंद, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन, पळशी, सातारा रोड, कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, कऱ्हाड , वांगी, भिलवडी, ताकारी आदी स्टेशन मीटर गेज रेल्वेलाईनला होती. दरम्यानच्या काळात कोळशाच्या वाफेवर चालणारी इंजिन वापरात होती. त्यामुळे वेगाला मर्यादा होत्या. तर मालवाहतूक करण्यातही मर्यादा होत्या.पुणे-साताऱ्यांपर्यंत आंबळे-शिंदवणे, जेजुरी-वाल्हे, सालपे-वाठार स्टेशन अवघड घाट, मोठमोठ्या डोंगरातून वेडीवाकडी वळणे होती. मीटर गेज रेल्वेलाईनला आदर्की येथे बोगदा होता. त्यानंतर ५० वर्षांपूर्वी ब्रॉड गेज रेल्वेलाईन टाकण्याचे काम सुरू होऊन त्याचे सर्वेक्षण करताना नवीन रेल्वेस्थानके अंमलात आणली तर काही रेल्वेस्टेशनची जागा बदलली.

ब्रॉड गेज रेल्वेलाईनवर सासवड रोड, फुरसंगी, आळंदी, शिंदवणे, आंबळे, जरेंडश्वर, सातारा ही नवीन झाली, तर आदर्कीत जुन्या बोगद्यातून ब्रॉडगेज रेल्वे गेली तर आदर्कीत नवीन बोगद्याबरोबर शिंदवणे ते आंबळे स्टेशनदरम्यान नवीन तीन बोगदे खोदून मीटर गेज रेल्वेलाईन काढून ब्रॉडगेज रेल्वे लाईन सुरू झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRailway Passengerरेल्वे प्रवासी