शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

सातारा : रॅलीतून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती, काटवलीत घराघरातून पिशव्या गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:02 IST

काटवलीची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे चालली असून ग्रामपंचायत, विद्यार्थी व युवकांनी प्लास्टिक बंदीचा नारा देत पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला. याच माध्यमातून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी घरोघरी जाऊन प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या.

ठळक मुद्दे रॅलीतून प्लास्टिकमुक्तीची जनजागृतीकाटवलीची स्मार्टग्रामकडे वाटचाल; घराघरातून पिशव्या गोळा

पाचगणी (सातारा) : काटवलीची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे चालली असून ग्रामपंचायत, विद्यार्थी व युवकांनी प्लास्टिक बंदीचा नारा देत पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला. याच माध्यमातून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी घरोघरी जाऊन प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या.महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक व थर्माकोल या अविघटनशील वस्तूंचा वापर न करता त्यावर बंदी घालण्याच्या अधिसूचनेनुसार व जिल्हा परिषद सातारा आणि जावळी पंचायत समिती यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत क्षेत्रात या अधिसूचनेची अंमलबजावनी करण्यासाठी काटवली येथे ग्रामपंचायत आणि प्राथामिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली.प्लास्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश दिला. गणेशोत्सव काळात प्लास्टिक व थर्माकोलच्या मोठ्या प्रमाणात होत असणाऱ्या वापराचे औचित्य साधून ही रॅली काढली.यामध्ये सरपंच हणमंत बेलोशे, उपसरपंच दत्तात्रय सुतार, सदस्या सविता बेलोशे, अलका शिंदे, नंदा बेलोशे, मेघा जंगम, मुख्याध्यापक शैलेश महामुनी, ग्रामसेवक धनराज वट्टे, महादेव बेलोशे तसेच शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.|यावेळी प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरण वाचावा, कागदी पिशव्यांचा वापर कराह्ण, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. ग्रामपंचायत सदस्यांनी घरोघरी जाऊन प्लस्टिकचे दुष्परिणाम सर्वांना सांगितले. यावेळी प्रत्येक घरातील प्लास्टिक कचऱ्यांची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे दीडशे किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला केला.महाराष्ट्र अविघटनशील कचरा कायदा २००६ चे कलम ९ नुसार प्लास्टिक वस्तूच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. वापर करणाऱ्यास दंड अथवा शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे गावात कुणीही प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन सरपंच हणमंत बेलोशे यांनी केले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSatara areaसातारा परिसरPanchgani Hill Stationपाचगणी गिरीस्थान