शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : चालत्या बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका, जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 17:25 IST

कऱ्हाड ते सातारा एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. बस चालकाने प्रसंगावधान राखत भरधाव वेगाने बस जिल्हा रुग्णालयात आणून प्रवाशावर तातडीने उपचार केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात गत वर्षी मार्च महिन्यात २५ टँकर होते सुरूदुष्काळी पट्ट्यातील पाणी साठ्यांत चांगलीच वाढ

सातारा : कऱ्हाड ते सातारा एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. बस चालकाने प्रसंगावधान राखत भरधाव वेगाने बस जिल्हा रुग्णालयात आणून प्रवाशावर तातडीने उपचार केले.याबाबत माहिती अशी की, भीमराव शामराव वास्के (रा. काले, ता. कऱ्हाड ) हे सातारा येथील एका महाविद्यालयात नोकरी करतात. नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर थांबले होते. दरम्यान, ठाणे आगाराची गलमेवाडी ते ठाणे जाणाऱ्या बसमध्ये (एम एच १४ बीटी ३९३४) साताऱ्याला येण्यासाठी बसले.वास्के हे बसच्या सीटवर बसल्यानंतर साताऱ्यातील पोवई नाका परिसरात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते बेशुद्ध झाले. ही बाब बसमधील इतर प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बसचे वाहक पंढरीनाथ शेळके व चालक महेंद्र पिसाळ यांना माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून चालक पिसाळ यांनी प्रसंगावधान राखत बस थेट जिल्हा रुग्णालयातच नेली. त्यामुळे वास्के यांना तातडीचे उपचार मिळाले. या घटनेची माहिती मिळताच सातारा आगाराचे सहायक वाहतूक निरीक्षक सुधीर बारटक्के यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल