शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडीच्या संपावर सातारा पालिकेचा उतारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 14:21 IST

नगर पालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असुनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला.

ठळक मुद्दे६० टन कचºयाची विल्हेवाट : कर्मचाºयांच्या उपोषणानंतर आरोग्य विभागाचं ‘पुढचं पाऊल’

सातारा : नगर पालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असुनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला. रोजंदारीवर काम करणारे ४० कर्मचारी, चार ट्रॅक्टर, एक कॉम्पॅक्टर आणि दोन टीपरच्या माध्यमातून आरोग्य विभागाने तब्बल ६० टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.सातारा शहरातील चाळीस वार्डातून ४२ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. दिवसभरात तब्बल ७० ते ७५ टन कचरा गोळा करून त्याची सोनगाव कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या वतीने घंटागाडीसाठी नव्याने राबविण्यात येणाºया ई-टेंडर पद्धतीला अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने विरोध दर्शविला असून हा निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून (दि. २८) पालिकेत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने व सर्वच घंटागाड्यांची चाके थांबल्याने शहरात साचणारा कचरा उचलणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने यावर तोडगा काढून शहराची झाडून स्वच्छता केली.रोजंदारीवर काम करणारे ४० कर्मचारी, चार ट्रॅक्टर, १ कॉम्पॅक्टर आणि दोन टीपरच्या माध्यमातून आरोग्य विभागाने शहरातील जागो-जोगी साचलेला कचरा गोळा करून त्याची सोनगाव डेपोत विल्हेवाट लावली. दिवसभरात तब्बल ६० टन कचरा गोळा करण्यात आला.  ७० कचरा वेचकांची मदतसोनगाव कचरा डेपोत साचणाºया कचºयातून प्लास्टिक, लोखंड व इतर भंगाराचे साहित्य गोळा केले जाते. जवळपास ७० कचरा वेचक हे काम करून आपला उदरनिवार्ह चालवितात. शुक्रवारी आरोग्य विभागाच्या वतीने या सर्व कचरा वेचकांची मदत घेऊन शहरातील कचरा गोळा करण्यात आला.