शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, मारहाणीच्या घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 14:48 IST

सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी प्रशांत निकम यांना चार व्यावसायिकांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेला विरोध दर्शवत गुरुवारी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणाऱ्यांवर वेळीच आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.

ठळक मुद्देसातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, मारहाणीच्या घटनेचा निषेधमुजोर व्यावसायिकांवर आवर घालण्याची मागणी

सातारा : नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी प्रशांत निकम यांना चार व्यावसायिकांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेला विरोध दर्शवत गुरुवारी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणाऱ्यांवर वेळीच आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.मारहाण घटनेच्या निषेधार्थ पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निषेध सभा पार पडली. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रशासनापुढे आपली भूमीका स्पष्ट केली. याप्रसंगी नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेवक धनंजय जांभळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.अतिक्रमण विभागाचे लिपिक प्रशांत निकम यांना झालेली मारहाण ही निंदनीय घटना आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू लागल्याने व्यावसायिकांची मुजोरी वाढत चालली आहे. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश राहिला नाह.

आम्ही कोणाच्या घरचे काम करीत नाही. शासकीय नियमानुसारच अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करतो. मारहाणीसारख्या घटना अशाच घडत राहिल्या तर आम्ही काम कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने शहरातील सर्व बेकायदा अतिक्रमणे हटविण्याची परवानगी द्यावी व मारहाण करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर