शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात रिक्षांचे मीटर डाऊन !

By admin | Updated: April 2, 2017 15:37 IST

ठरवून होतो प्रवास : चालकांबरोबर प्रवाशांचीही डिजिटल मीटरला नापसंती

आॅनलाईन लोकमतसातारा : प्रवासी रिक्षांसाठी नव्याने बसविलेल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीटरमध्ये अनेक त्रुटी असल्याने चालकांबरोबर प्रवाशांचाही या मीटरवर विश्वास बसत नाही. शहरात फिरणाऱ्या सर्वच रिक्षांचे मीटर सध्या बंद अवस्थेत आहेत. यामुळे प्रवासीही रिक्षात बसण्यापूर्वी अमुक ठिकाणी किती घेणार? असा प्रश्न विचारून रक्कम ठरवत आहेत. प्रवासी रिक्षांसाठी नवीन डिजिटल मीटर सक्ती केल्यामुळे रिक्षा व्यावसायिकांनी पदरमोड करत ही मीटर बसविली. तरीही शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता खड्ड्यात वाहने आदळले की हे मीटर बंद होत आहे. अनेक वेळा चुकीची खाचखळग्यांच्या रस्त्यामुळे मीटर बंद चालू होऊन रिडिंग चुकीचे दाखविते. तर काहीवेळा बॅटरी चार्ज नसल्याने मीटर सुरू होत नाही तर अनेकवेळा मधूनच पहिल्यापासून रीडिंगला सुरुवात होते.यामुळे चालकाबरोबर प्रवाशांची वारंवार हमरी-तुमरी होते. मीटर सुरू केले तरी प्रवासी भाडे ठरवूनच प्रवास करत असल्याने मीटरपायी हजारो रुपये गुंतून पडल्याचे रिक्षा व्यावसायिकांनी सांगितले. नव्याने बसविण्यात आलेले मीटरचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा आहे. याचाही फटका रिक्षा व्यावसायिकांना बसत आहे. तर प्रवासी देखील शहरातून प्रवास करण्यासाठी प्रतिप्रवासी पैसे आकारत आहेत. त्यामुळे सध्या शहरातील बहुतांशी भागात शहरी प्रवासी सीटप्रमाणे प्रवास क रण्याचे प्रमाण वाढले असल्याने मीटरची आवश्यता लागत नाही. शहरी प्रवासी पद्धतीमुळे रिक्षाचा प्रवासी वर्ग वाढला असून, यातून व्यावसायिक व प्रवाशांमधील तक्रारीही कमी झाल्या असल्याचा रिक्षाचालकांना अनुभव आहे. जुन्या मीटरची मागणीनवीन मीटरचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा आहे. साताऱ्याचे रस्ते पाहता एवढा टप्पा होत नाही. त्यामुळे जुन्या मीटरप्रमाणे १ किलोमीटरचा पहिला टप्पा करावा, अशी मागणी काही रिक्षाचालकांनी केली आहे. पुण्यात सिग्नल अधिक असल्याने तेथे चालू मीटरमध्ये रिक्षा थांबून राहतात. त्यामुळे पुण्याला नवीन मीटर व्यावसायिकांना परवडतात, असेही मत काही चालकांनी व्यक्त केले.