शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जातीपातीच्या पलीकडे सातारा महामोर्चा

By admin | Updated: October 2, 2016 00:38 IST

वाई तालुक्यातील एकवीस समाज पाठीशी

कवठे : कवठे, ता. वाई येथे दि. ३० सप्टेंबर रोजी सातारा येथील मराठा महामोर्चाच्या प्रचारार्थ जनजागृती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या अग्रस्थानी ट्रॉलीमध्ये स्टेज व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चा प्रत्येक चौकात थांबवून प्रत्येक चौकामध्ये मुलींची मोर्चासंदर्भातील उत्स्फूर्त भाषणे होत होती. अग्रस्थानी शालेय विद्यार्थी त्यानंतर महिला व सर्वात शेवटी पुरुषवर्ग मोर्चात मार्गक्रमण करीत होते. प्रामुख्याने मोर्चाचा उद्देश व सर्वांनी सातारा येथील महामोर्चामध्ये एक दिवस मोर्चासाठी द्यावा व त्यामध्ये सर्वांनी सामील होण्यासाठी प्रबोधन करण्यात येत होते. मोर्चाच्या समारोपाच्या ठिकाणी मोर्चात सामील होण्यासाठीचे नियम व त्यासंदर्भातील आचारसंहितेचे सर्वांनी पालन करण्यासंदर्भात सूचना व शपथ देण्यात आली. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महामोर्चामध्ये सामील होण्यासाठी व पाठिंबा दर्शवत कवठे परिसरातील २१ समाजबांधवांनी महामोर्चास पाठिंबा दिल्याचे पत्र या ठिकाणी देण्यात आले. (वार्ताहर) दुर्गाभक्त होणार महामोर्चात अनवाणी सामील महामोर्चात सहभागी व्हायची इच्छा असली तरी वयोमानाने महामोर्चात ज्यांना जायला जमणार नाही, असे सर्व ज्येष्ठ नागरिक गावाची व नवरात्रोत्सव मंडळांच्या मंडपांची संरक्षणाची जबाबदारी घेणार असून, प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात चप्पल पाळणारे दुर्गाभक्त अनवाणी महामोर्चात सामील होणार आहेत. कवठेत सर्व व्यवहार बंद महामोर्चाला जाण्यासाठी कवठे परिसरातील सर्व व्यावसायिक तसेच शेतकरी वर्ग आपले सर्व व्यवहार बंद ठेवून महामोर्चात सहभागी होणार असल्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. विठ्ठलवाडी येथे सुद्धा कवठे येथील मोर्चा संपल्यानंतर जाऊन बैठकीचे आयोजन करून महामोर्चात विशेषत: महिला वर्गाने सामील होण्यासाठी आवाहन केले.