शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सातारा महामंडळ व्यवस्थापिका लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:37 IST

सातारा : मंजूर झालेल्या शैक्षणिक कर्जाचा तिसरा हप्ता देण्यासाठी १५ हजार ८०० रुपयांची लाच घेताना येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक

ठळक मुद्देसलग दुसºया दिवशी कारवाई शैक्षणिक कर्जाचा हप्ता मंजुरीसाठी १५ हजार स्वीकारले

सातारा : मंजूर झालेल्या शैक्षणिक कर्जाचा तिसरा हप्ता देण्यासाठी १५ हजार ८०० रुपयांची लाच घेताना येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक तबस्सुम शमशुद्दीन मुल्ला (वय ३१, रा. अजिंक्य विहार, निशिगंधा कॉलनी, कोडोली सातारा) हिला लाचलुचपतच्या अधिकाºयांनी रंगेहाथ पकडले.

येथील रविवार पेठेमध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय आहे. संबंधित तक्रारदार यांच्या मुलीला शैक्षणिक कर्ज मंजूर झाले होते. या कर्जाचा तिसरा हप्ता मुलीच्या नावावर जमा करण्यासाठी तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र, तरीही हप्ता जमा केला नाही. तक्रारदाराकडे १५ हजार ८०० रुपयांच्या लाचेची मागणी तबस्सुमने केली.

त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचतपच्या अधिकाºयांकडे दि. ५ रोजी रितसर तक्रार नोंदविली. त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाºयांनी शहानिशा केली असता लाचेची मागणी होत असल्याचे पुढे आले. त्यानंतर अधिकाºयांनी गुरुवारी दुपारी रविवार पेठेतील कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी तबस्सुमला १५ हजार ८०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सातारा शहर पोलिस ठाण्यात तबस्सुम विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

औद्योगिक महामंडळाच्या लिपिकाला रंगेहाथ पकडल्यानंतर सलग दुसºया दिवशी एसीबीने ही कारवाई केल्याने साताºयात खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडायांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला, हवालदार संभाजी बनसोडे, आनंदराव सपकाळ, भरत शिंदे, विजय काटवटे,तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसूळ, अजित कर्णे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विनोद राजे,विशाल खरात, नीलिमा जमदाडे, मधुमती कुंभार, श्रद्धा माने यांनी भाग घेतला.महिलांचे प्रमाण अत्यल्प...खंडाळ्याच्या तत्कालीन तहसीलदार सुप्रिया बागवडेला काही वर्षांपूर्वी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर बरीच वर्षे एकही महिला एसीबीच्या जाळ्यात सापडली नव्हती. तबस्सुम मुल्ला ही कारवाई झालेली बहुदा दुसरी महिला आहे. पुरुषांच्या तुलनेत लाच घेण्याचे प्रमाण महिलांचे अत्यल्प असल्याचे एसीबीच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.