शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘सातारा लोकमत’चा उद्या वर्धापन दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:08 IST

सातारा : चोखंदळ वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या सातारा ‘ लोकमत’ च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. १५ रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत राधिका चौकातील राधिका संकुलमध्ये वाचकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.सातारा जिल्ह्याच्या लौकिकास साजेसे कार्य केलेल्यांना ‘लोकमत’ने ...

सातारा : चोखंदळ वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या सातारा ‘लोकमत’च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. १५ रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत राधिका चौकातील राधिका संकुलमध्ये वाचकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.सातारा जिल्ह्याच्या लौकिकास साजेसे कार्य केलेल्यांना ‘लोकमत’ने कायमच प्रकाशझोतात आणण्याचे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या जडणघडणीच्या दृष्टीने ‘लोकमत’ने आपल्यातीलच रोलमॉडेल समाजासमोर आणले आहेत. त्यातूनच ‘गुड न्यूज’ सातारकरांसाठी घेऊन येण्याची परंपरा ‘लोकमत’ने साताऱ्यात रुजवली. या उपक्रमाचे वाचकांनी नेहमीच स्वागत केले आहे. त्यांचे प्रेम नेहमीच जाणवत आले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाºया अनेक ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघात होत होते. त्यामुळे ’लोकमत’च्या पुढाकारातून अनेक सामाजिक संघटनांनी जवळपास पाच हजार ट्रॉलींना मोफत रेडियम बसविले. त्यानंतर ऊस वाहतूक करणाºया टॅÑक्टरच्या अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले.सकारात्मक बातम्या देत असतानाच समाजात चाललेल्या गैरकृत्यांवरही तिसरा डोळा ठेवण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. त्यामुळेअनेक ‘इनिशिएटिव्ह’ला यश आले आहे.यामुळेच ‘लोकमत’वरील वाचकांचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे. हे प्रेम आणखी जोपासण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत स्नेहमेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा साताºयातील बुधवार पेठेमधील राधिका संकुलमध्ये होणार आहे. वाचक, जाहिरातदार, विक्रेते यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.‘उद्यमशील सातारा’ वाचकांच्या भेटीला...सातारा ‘लोकमत’च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्ताने सोमवारपासून ‘उद्यमशील सातारा’ हा विशेषांक प्रसिद्ध केला जात आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योगविश्वाचा इतिहास, उद्योगक्षेत्रातील घडामोडी समोर आणण्यात येणार आहेत. त्यातूनच नवीन माहिती वाचकांसमोर येण्यास मदत होणार आहे.