शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : विहिरीत पडलेल्या बिबट्याने स्वत:च घेतली बाहेर उडी, वन कर्मचारी घटनास्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 14:40 IST

कऱ्हाड तालुक्यातील कालवडे येथील एका विहिरीत शुक्रवारी सकाळी एक बिबट्या पडला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. विहिरीभोवती ग्रामस्थांचा गराडा पडल्याने बिबट्या आणखीच भेदरला.

ठळक मुद्देविहिरीत पडलेल्या बिबट्याने स्वत:च घेतली बाहेर उडी, वन कर्मचारी घटनास्थळी बिबट्या अचानक बाहेर आल्याने कालवडे ग्रामस्थांची पळापळ

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कालवडे येथील एका विहिरीत शुक्रवारी सकाळी एक बिबट्या पडला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. विहिरीभोवती ग्रामस्थांचा गराडा पडल्याने बिबट्या आणखीच भेदरला.विहिरीत बऱ्यापैकी पाणी असून, तो काठावर बसला होता. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी बिबट्या बाहेर काढण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

त्याच दरम्यान भेदरलेल्या बिबट्याने स्वत:च विहिरीतून बाहेर उडी घेत गर्द झाडीमध्ये धूम ठोकली. बिबट्या अचानक बाहेर पडल्याने ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. भयभीत झालेले ग्रामस्थ सैरावैरा सुरक्षितस्थळी पळाले.

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसर