शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

सातारा : कऱ्हाडात शिवजयंती सोहळा, जय शिवाजी, जय भवानीचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 16:01 IST

कऱ्हाड शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दरम्यान, बुधवार, दि. १८ एप्रिल रोजी शहरात दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दत्तचौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सर्वत्र जय शिवाजी, जय भवानीचा गजर घुमू लागला आहे.

ठळक मुद्देकऱ्हाडात शिवजयंती सोहळा, जय शिवाजी, जय भवानीचा गजरचौका-चौकात आकर्षक कमानीसह विद्युत रोषणाई

कऱ्हाड : कऱ्हाड शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दरम्यान, बुधवार, दि. १८ एप्रिल रोजी शहरात दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दत्तचौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सर्वत्र जय शिवाजी, जय भवानीचा गजर घुमू लागला आहे.मंगळवारी शहरातील पाटण कॉलणी, चावडी चौक, आझाद चौक, शाहू चौक, दत्तचौक या चौकांसह शहरातील इतर चौकांमध्ये शिवसैनिकांकडून मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. सकाळपासून शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने शहरातील दत्तचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.

जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. यानंतर शिवसैनिकांकडून टाऊन हॉल, विजय दिवस चौक, बसस्थानक, दत्त चौक, आझाद चौकमार्गे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शिवसैनिकांच्या घोषणांनी तसेच पोवाड्यांनी दत्तचौक व चावडी चौक परिसर दुमदुमून गेला होता.हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने प्रती वर्षीप्रमाणे बुधवारी शिवजयंतीनिमित्त सायंकाळी पाच वाजता शहरातून शाही दरबार मिरवणूक काढली जाते. या दरबार मिरवणूकीस दरवर्षी हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शिवसैनिक कऱ्हाडात हजेरी लावतात.याहीवर्षी हिंदू एकताच्यावतीने दरबार मिरवूणक काढण्यात येणार असून मिरवणूकीत विविध चित्ररथांचा सहभाग असणार आहे.

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Satara areaसातारा परिसर