शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

सातारा : खासदार उदयनराजेंच्या सोहळ्याची उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 15:26 IST

साताऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे आज आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर तयारीत कोणतीही कमतरता राहू नये, याची खबरदारी घेण्यात उदयनराजे मित्र समूहासह सातारा पालिकेची संपूर्ण टीम राबताना पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देउदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोहळ्याची तयारी

सातारा : साताऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे आज आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर तयारीत कोणतीही कमतरता राहू नये, याची खबरदारी घेण्यात उदयनराजे मित्र समूहासह सातारा पालिकेची संपूर्ण टीम राबताना पाहायला मिळत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री विजय शिवतारे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित पार पडणाऱ्या सोहळ्याची तयारी अजूनही सुरूच आहे.जिल्हा परिषदेच्या मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. समोर लाखभर लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे युवक-युवती या सोहळ्याची तयारी न्याहाळताना दिसत आहेत. सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री व इतर मान्यवर मैदानावर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

पूर्वीच्या नियोजनानुसार मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून थेट कास परिसरात उतरणार होते. तिथे कास धरण उंची वाढविण्याच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार होते. मात्र, या नियोजनात बदल करण्यात आला आहे.

सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पोलीस परेड मैदानाच्या हेलिपॅडवर उतरेल. तिथून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित स्मार्ट पोलीस ठाण्यांचा गौरव त्यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर पोवई नाका येथे ग्रेड सेपटरेटर व कास उंची वाढविणे व भूमीगत गटार योजना या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येईल. तिथून जिल्हा परिषदेसमोर नियोजित पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करून ते सैनिक स्कूलवर आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर खासदार उदयनराजे मित्र समूहाने आयोजित केलेल्या भव्य सोहळा मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे. शासकीय विश्रामगृहासह, जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ आहे. ठिकठिकाणी पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर याठिकाणांहून पोलीस कर्मचारी व अधिकारी साताऱ्यांत दाखल झाले आहेत.जानकरांनी सकाळीच घेतली भेटराज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे शुक्रवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले. त्यांनी सकाळी जलमंदिरवर जाऊन उदयनराजेंची भेट घेतली. तिथून पाचगणी येथे आयोजित शाळेच्या एका कार्यक्रमासाठी गेले. तिथून ते पुण्याला निघून गेले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर