शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :जखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:06 IST

जखीणवाडी, ता. कऱ्हाड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली. मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वप्नील भिंगारदेवे यांच्या गोशाळेत ही घटना घडली.

ठळक मुद्देजखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठारग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

कऱ्हाड : जखीणवाडी, ता. कऱ्हाड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली. मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वप्नील भिंगारदेवे यांच्या गोशाळेत ही घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, जखीणवाडी, ता. कऱ्हाड येथे स्वप्नील भिंगारदेवे यांची गोशाळा आहे. गोशाळेच्या शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याने सोयीसाठी म्हणून आपली एक शेळी भिंगारदेवे यांच्या गोशाळेत मंगळवारी रात्री बांधली होती.

रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोशालेतील कामगारास गायींचा हंबरडा सुरू असलेला ऐकू आला. यानंतर कामगाराने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला ठार मारल्याचे त्याच्या निदर्शनास आले.कामगाराने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. तसेच परिसरातील नागरिकांना बोलविले.

नागरिकांसह सर्वांनी फटाके वाजविले. फटाक्यांच्या आवाजाने बिबट्या त्या ठिकाणाहून पळून गेला. या घटनेमुळे जखीनवाडी पसिरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसर