शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : लग्नातील बक्षिसीवरून वाढप्याचा खून, एकाच कुटुंबातील पाचजण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:13 IST

लग्नकार्यात बक्षीस स्वरूपात मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून वाढप्याचा कुऱ्हाड व कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना जावळी तालुक्यातील सोनगाव येथे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. राहूल मेंगळे (वय ३५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देलग्नातील बक्षिसीवरून वाढप्याचा खून, एकाच कुटुंबातील पाचजण अटकेतजावळी तालुक्यातील सोनगाव येथील घटना

सायगाव : लग्नकार्यात बक्षीस स्वरूपात मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून वाढप्याचा कुऱ्हाड व कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना जावळी तालुक्यातील सोनगाव येथे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली.राहूल मेंगळे (वय ३५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. मोहन सुखदेव मेंगळे, अनिल मोहन मेंगळे, विशाल मोहन मेंगळे, सनी मोहन मेंगळे व नंदा मोहन मेंगळ (रा. सोनगाव, ता. जावळी) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत मेढा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यात सर्व आरोपी व मयत व्यक्तीचा भाऊ विश्वनाथ मेंगळे हे वाढपी म्हणून गेले होते. यावेळी त्यांना एक हजार रुपये बक्षीस स्वरूपातदेण्यात आले होते. हे पैसे कोणालाच द्यायचे नाही यावरून मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास विश्वनाथ मेंगळे व त्याचा भाऊ राहूल मेंगळे यांना या सर्वांनी धक्काबुक्की करत मारहाण केली.

हा वाद विकोपाला गेल्याने सनी मेंगळे याने विश्वनाथ मेंगळे यांच्या डोक्यात खोरे मारून त्यांना जखमी केले. यानंतर अनिल मेंगळे याने राहूल मेंगळे याच्यावर कुऱ्हाड व कोेयत्याने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेनंतर संबंधित आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी रात्रभर शोध घेऊन पाचही आरोपींना अटक केली. यापैकी तीघे शिवारात तर दोघे घरातील माळ्यावर लपून बसले होते. विश्वनाथ मेंगळे यांनीपोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने तपास करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMurderखून