शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : अर्थ, आरोग्य, प्रशासनाला मिळेना पूर्णवेळ कारभारी.., अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत

By नितीन काळेल | Updated: June 8, 2023 12:17 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाही प्रभारींवरच.

सातारा : जिल्हा परिषदेत सवा वर्षापासून प्रशासक राजवट असतानाही अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून, महत्त्वाच्या अर्थ, आरोग्य, सामान्य प्रशासन आणि ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार प्रभारीवरच आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे तब्बल पाच महिन्यांपासून आरोग्य आणि सामान्य प्रशासनाला पूर्णवेळ अधिकारीच मिळालेला नाही.

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणतात. गावगाड्याचा थेट संबंध ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नंतर जिल्हा परिषदेशी येतो. याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावांत विकासगंगा वाहते. त्यातच जिल्हा परिषदेत १५ हून अधिक विभाग आहेत. या विभागासाठी स्वतंत्र अधिकारी आहेत. पण, सातारा जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे दुसऱ्या विभागाचा पदभार दिला गेला आहे. यामुळे अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडत आहे. असे असले तरी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनीही योग्य घडी बसवत कमी अधिकारी असतानाही ताळमेळ घातला आहे. त्यामुळे सध्यातरी कामकाजात सुसूत्रता आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी असणारे डाॅ. राधाकिशन पवार यांची नोव्हेंबर महिन्यात पदोन्नतीवर बदली झाली. त्यानंतर आतापर्यंतच्या सात महिन्यांत तिघा प्रभारींकडे पदभार गेलेला आहे. सुरुवातीला डाॅ. वैशाली बडदे यांनी काम पाहिले. फेब्रुवारीत त्यांची बदली पुण्याला झाल्यानंतर डाॅ. राजेश गायकवाड यांच्याकडे पदभार आला. त्यांनीही दीड-दोन महिने काम केले. त्यानंतर डाॅ. प्रमोद शिर्के यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारीपद आले आहे. त्यांनाही दोन-दोन विभागांचा कारभार पाहवा लागत आहे. सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांची अकोला येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे हा पदभार आलेला आहे, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांची मार्च महिन्यात पदोन्नतीवर बदली झाली. सध्या लेखाधिकारी संदीप निंबाळकर यांच्याकडे प्रभारी पदभार आहे. या ठिकाणीही दीड महिन्यापासून पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही.

ग्रामीण विकास यंत्रणेत सतत प्रभारी...जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार पाच वर्षांत सतत प्रभारींवरच राहिलेला आहे. सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २२ पर्यंत सुषमा देसाई यांच्याकडे पदभार होता. त्यानंतर चंचल पाटील यांनी पदभार स्वीकारला. पण, चार महिन्यांतच त्यांची बदली झाली. त्यामुळे सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्याकडे पदभार आलेला आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी