शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: झाडानी प्रकरणी २९ जुलैला अंतिम सुनावणी, कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन, चंद्रकांत वळवी यांची माध्यमांसमोर कबुली

By दीपक देशमुख | Updated: July 11, 2024 14:36 IST

Satara News: झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी काही कागदपत्रे सादर केली तर उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी व म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली.

- दीपक देशमुखसातारा - झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी काही कागदपत्रे सादर केली तर उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी व म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. सुशांत मोरे यांनी हे प्रकरण संवेदनशील असून देशाचे लक्ष लागल्याचे सांगून आणखी जास्त तारखा नको, यापुर्वीच चार तारखा झाल्याचे सांगितले. यानंतर जीवन गलांडे यांनी दि. २९ जुलैला सर्व कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले आहे. याच दिवशी या प्रकरणाची अंतीम सुनावणी होणार आहे. दरम्यान, माध्यमांसमोर चंद्रकांत वळवी यांनी कमाल जमीन कायद्याचे उल्लंघन झाल्याचे मान्य करत शासन नियमानुसार कार्यवाही करत असल्याचे सांगितले.

झाडाणी येथील ६२० एकर जमीन व्यवहारप्रकरणी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांच्यासह आणखी आठ जणांना नोटीस काढली होती. याप्रकरणी ११ जून, २० जुन रोजी सुनावणी झाली तर ३ जुलैची सुनावणी रद्द हाेवून ११ जुलैला सुनावणी घेण्यात आली. त्यानुसार चंद्रकांत वळवी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात हजर झाले. यावेळी नोटीस बजावलेले संबंधित हजर होते. त्यांनी काही कागदपत्रे सादर केली व उर्वरित कागदपत्रे सादर करण्यास पुढील तारीख मागितली. जीवन गलांडे यांनी शेवटची संधी देत असच्याचे सांगत दि. २९ रोजी सर्व कागदपत्रांनिशी हजर राहण्यास सांगितले.

सुनावणी झाल्यनंतर माध्यमांसमोर बोलताना चंद्रकांत वळवी म्हणाले, या व्यवहारात कमाल जमीन कायद्याचा उल्लंघन झाले आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार सध्या कार्यवाही सुरू आहे. परंतु, झाडाणीतील व्यवहारप्रकरणी तेथील लोकांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत बोलण्यास नकार देत शासन योग्य ते निर्णय घेईल, असे वळवी यांनी सांगितले. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. सुनावणीला हजर रहावे लागत असले तरी सर्वसामान्य लोकांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागते, तसेच आम्हीही या प्रसंगाला सामोरे जावू, असे वळवी म्हणाले.

लवकरात लवकर निकाल अपेक्षित : सुशांत मोरेया प्रकरणी यापुर्वी चार तारखा झाल्या आहेत. आज चंद्रकांत वळवी यांनी त्यांच्या राज्यातील अर्थसंकल्प असल्याचे कारण देत उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली आहे. त्यानुसार अप्प्पर जिल्हाधिकारी यांनी शेवटची संधी देत २९ जुलैला सर्व कागदपत्रांनिशी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी उर्वरित कागदपत्रे मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. या प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले असून प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागणे अपेक्षित असल्याचे सुशांत मोरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर