सातारा : जिल्ह्यात ८६ वर्षांची यशस्वी वाटचाल असणाऱ्या सातारा एज्युकेशन सोसायटी कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची २०२१-२२ या वर्षासाठी मोफत प्रवेश व त्याच्या सर्व शैक्षणिक
शिक्षणांची जबाबदारी संस्था सामाजिक बांधिलकीतून घेणार आहे, अशी माहिती संस्थेच्या चेअरमन डॉ. चेतना माजगावकर यांनी दिली.
प्रसिद्धिपत्रकात माजगावकर यांनी म्हटले आहे की,
कोरोनामुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. अनेक मुले निराधार झाले आहेत.
त्यांना आधार देण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासनाने विविध योजना सुरू
केल्या आहेत. त्यालाच हातभार म्हणून महाराष्ट्रातील नामवंत शिक्षण संस्था
असणाऱ्या सातारा एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळातील सर्व संचालकांनी
घेतलेला निर्णय सामाजिक बांधिलकी या नात्याने कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी संस्थेने उचलण्याचे ठरवले आहे.
संस्थेच्या बालवाडी ते पॉलिटेक्निकपर्यंत विविध शाखा आहेत. संस्थेच्या केशव
गोरे पूर्वप्राथमिक शाळा–बालवाडी, आण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक
विद्यालयात पहिली ते चौथी, अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पाचवी ते दहावी, एन. बी. देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात व्यवसाय शिक्षण, सातारा
पॉलिटेक्निक, सातारा येथे विविध प्रकारचे कोर्स, या विविध शाखा असून शैक्षणिक
गुणवत्ता उत्कृष्ट आहे. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये कोरोनामुळे अनाथ
झालेल्या विद्यार्थ्यांना २०२१-२२ या वर्षासाठी मोफत प्रवेश व त्यांच्या
सर्व शैक्षणिक शिक्षणाची जबाबदारी संस्था घेणार आहे. (वा. प्र.)