शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : खुन्नसच्या कारणावरून युवकाचा भोकसून खून, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 10:43 IST

चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वारंवार खुन्नस दिल्याच्या कारणावरून धारधार शस्त्राने भोकसून युवकाचा खून करण्यात आला. कऱ्हाड तालुक्यातील कुसूर येथे ही घटना घडली. उमेश उद्धव मोरे (वय २०) असे खून झालेल्याचे नाव असून, उमेशला मंगळवारी सायंकाळी भोकसण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देखुन्नसच्या कारणावरून युवकाचा भोकसून खून, आरोपीस अटक कुसूर ग्रामपंचायत निवडणुकीत वाद

कऱ्हाड (सातारा) : चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वारंवार खुन्नस दिल्याच्या कारणावरून धारधार शस्त्राने भोकसून युवकाचा खून करण्यात आला.

कऱ्हाड तालुक्यातील कुसूर येथे ही घटना घडली. उमेश उद्धव मोरे (वय २०) असे खून झालेल्याचे नाव असून, उमेशला मंगळवारी सायंकाळी भोकसण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांनी आरोपी गणेश आनंदराव देशमुख (रा. कुसूर) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसूर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक चार महिन्यांपूर्वी झाली आहे. निवडणूक निकालानंतर गावातील उमेश मोरे व गणेश देशमुख या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वेळोवेळी या दोघांत शाब्दिक चकमक उडत होती. काही दिवसांपूर्वी गावच्या यात्रेतही दोघांमध्ये वाद झाला होता.दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गणेश देशमुख व उमेशचा भाऊ सुशांत यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद निदर्शनास येताच उमेश त्या ठिकाणी गेला. त्यावेळी गणेशने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने उमेशवर वार केला. तसेच उमेशच्या छातीत व पोटात भोकसले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

नातेवाईक व परिसरातील ग्रामस्थांनी त्याला उपचारार्थ कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी गणेश देशमुखला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक भापकर तपास करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMurderखून