शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल

By नितीन काळेल | Updated: July 14, 2025 22:23 IST

६५ गट, १३० गणांची रचना; खटाव, फलटण, कोरेगावमध्ये एक गट वाढीव; २१ जुलैपर्यंत हरकती घेणार

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होत असून सोमवारी ६५ गट आणि पंचायत समितीच्या १३० गणांचा प्रारुप आराखडा जाहीर झाला आहे. यामध्ये अनेक तालुक्यांत गट आणि गणात मोडतोड झाली असून नावेही बदलली आहेत. तसेच काही ठिकाणी गावांची अदलाबदलही झाली आहे. त्यामुळे याबाबत आता २१ जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. तर आताच्या निवडणुकीसाठी खटाव, फलटण आणि काेरेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दाेन गट वाढले आहेत.

जिल्हा परिषदेची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते. जिल्ह्यात ६५ गट आणि ११ तालुक्यांत पंचायत समितीचे एकूण १३० गण असणार आहेत. याबाबत प्रशासनाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभाग रचना प्रसिध्द केली आहे. यामध्ये बहुतांशी जुन्या गटांची आणि गणांची नावे जैसे तेच आहेत. पण, काही ठिकाणी बदल झाला आहे. तसेच खटाव, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढलेत. यामुळे या तालुक्यात पूर्वीच्या गट आणि गणात मोडतोड झाली आहे. काही गावे दुसरीकडे तसेच नवीन गट-गणात जोडण्यात आली आहेत. तसेच याच तालुक्यात नवीन गट आणि गण निर्माण झालेत. त्यातील काही पूर्वी गट होते. आताच्या या प्रारुप रचनेवर नागरिकांना २१ जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्तांसमोर प्रत्यक्षात सुनावणी होऊन पुढील निर्णय होणार आहे.

तालुकानिहाय गट अन् गण...

कऱ्हाड

पाल - पाल, चरेगावउंब्रज - उंब्रज, तळबीडमसूर - मसूर, वडोली भिकेश्वरकोपर्डे हवेली - कोपर्डे हवेली, वाघेरीसैदापूर - सैदापूर, हजारमाचीवारुंजी - वारुंजी, कोयना वसाहततांबवे - तांबवे, सुपनेविंग - विंग, कोळेकार्वे - कार्वे, गोळेश्वररेठरे बुद्रुक - रेठरे बुद्रुक, शेरेकाले - काले, कालवडेयेळगाव - येळगाव, सवादे

सातारा

पाटखळ - पाटखळ, शिवथरलिंब - लिंब, कोंडवेखेड - खेड, क्षेत्र माहुलीकोडोली - कोडोली, संभाजीनगरकारी - कारी, परळीशेंद्रे - शेंद्रे, निनामवर्णे - वर्णे, अपशिंगेनागठाणे - नागठाणे, अतित

खटाव

बुध - बुध, डिस्कळपुसेगाव - पुसेगाव, खटावकातरखटाव - कातरखटाव, दरुजनिमसोड - निमसोड, गुरसाळेऔंध - औंध, सिध्देश्वर, कुरोलीम्हासुर्णे - म्हासुर्णे, पुसेसावळीमायणी - मायणी, कलेढोण

फलटण

तरडगाव - तरडगाव, पाडेगावसाखरवाडी पिंपळवाडी - साखरवाडी पिंपळवाडी, सस्तेवाडीविडणी - विडणी, सांगवीगणवरे - गुणवरे, आसूबरड - बरड, दुधेबावीकोळकी - कोळकी, जाधववाडी (फ)वाठार निंबाळकर - वाठार निं., सुरवडीहिंगणगाव - हिंगणगाव, सासवड

खंडाळा

शिरवळ - शिरवळ, पळशीभादे - भादे, नायगावखेड बुद्रुक - खेड, बावडा

जावळी

कुसुंबी - कुसुंबी, आंबेघर त. मेढाकुडाळ - कुडाळ, सायगावम्हसवे - म्हसवे, खर्शी बारामुरे

माण

आंधळी - आंधळी, मलवडीबिदाल - बिदाल, वावरहिरेमार्डी - मार्डी, वरकुटे म्हसवडगोंदवले बुद्रुक - गोंदवले बुद्रुक, पळशीकुकुडवाड - कुकुडवाड, वरकुटे मलवडी

कोरेगाव

पिंपोडे बुद्रुक - पिंपोडे बुद्रुक, सोनकेवाठार स्टेशन - वाठार स्टेशन, अंबवडे सं. वाघोलीसातारारोड - सातारारोड, किन्हईकुमठे - कुमठे, ल्हासुर्णेएकंबे - एकंबे, सापवाठार किरोली - वाठार किरोली, आर्वी

महाबळेश्वर

तळदेव - तळदेव, कुंभरोशीभिलार - भिलार, मेटगुताड

पाटण

गोकूळ तर्फ हेळवाक - गोकूळ, कामगरगावतारळे - तारळे, मुरुडम्हावशी - म्हावशी, चाफळमल्हारपेठ - मल्हारपेठ, नाडेमारुल हवेली - मारुल हवेली, नाटोशीमंद्रूळ कोळे - मंद्रूळ कोळे, सणबूरकाळगाव - काळगाव, कुंभारगाव

वाई

यशवंतनगर - यशवंतनगर, अभेपुरीबावधन - बावधन, शेंदूरजणेओझर्डे - ओझर्डे, केंजळभुईंज - भुईंज, पाचवड

टॅग्स :Electionनिवडणूक 2024