शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मंडलाधिकारी अन् तलाठी एकाचवेळी लाच घेताना सापडले, फलटण येथील घटना

By दत्ता यादव | Updated: January 25, 2024 22:06 IST

Satara News: फलटण येथील मंडलाधिकारी आणि महिला तलाठीला १३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले. सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी दोघांनी लाच घेतल्याचे समोर आले आहे.

- दत्ता यादवसातारा - फलटण येथील मंडलाधिकारी आणि महिला तलाठीला १३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले. सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी दोघांनी लाच घेतल्याचे समोर आले आहे. महसूल विभागात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.  

मंडलाधिकारी जितेंद्र बाळासाहेब कोंडके (वय ५३, रा. पुजारी काॅलनी, फलटण), तलाठी रोमा यशवंत कदम (३१, रा. मलटण, ता. फलटण, जि. सातारा), अशी लाच घेताना सापडलेल्या मंडलाधिकारी आणि तलाठी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी पत्रानुसार सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. त्याला तलाठी रोमा कदम हिने स्वतःसाठी तीन हजार आणि मंडलाधिकारी जितेंद्र कोंडके याच्यासाठी १० हजार,  असे एकूण १३ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, फलटण येथे गुरुवारी दुपारी चावडीमधील एकाच इमारतीत लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. त्यावेळी मंडलाधिकारी कोंडके याला १३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. मंडलाधिकाऱ्यावर कारवाई झाल्यानंतर काही वेळातच तलाठी रोमा कदम हिलाही ताब्यात घेण्यात आले. फलटण शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण